Andheri Sports Complex Swimming Pool : अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची डागडुजी

अंधेरीतील शहाजी राजे क्रिडा संकुलातील जलतरण तलावांशी संबंधित सर्व सुविधांसह विद्यमान जलतरण तलावांची तपासणी तसेच परिरक्षण करण्यासाठी तसेच जलतरण तलावांचे नुतनीकरण प्राधान्याने करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली होती.

1233
Andheri Sports Complex Swimming Pool : अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची डागडुजी

अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची दुरुस्ती तथा नुतनीकरण करण्यात येत आहे. तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून हे नुतनीकरण करण्यात येणार असून तलावातील फरशा तथा लादी काढून नवीन बसवणे तसेच जुनी जलवाहिनी बदलून नवीन जलवाहिनी टाकणे, शिवाय कपडे बदलण्याच्या खोलींची सुधारणा करण्यात येणार आहे. अंधेरीतील शहाजी राजे क्रिडा संकुलातील जलतरण तलावांशी संबंधित सर्व सुविधांसह विद्यमान जलतरण तलावांची तपासणी तसेच परिरक्षण करण्यासाठी तसेच जलतरण तलावांचे नुतनीकरण प्राधान्याने करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली होती. (Andheri Sports Complex Swimming Pool)

त्यानुसार सल्लागाराने सुचवलेल्या शिफारशींसह कामे हाती घेण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. या कामांमध्ये बॅलॅसिंग टँक आणि ओवरफ्लो चॅनेलमधील संपूर्ण फरशा तथा लादी काढून क्रिस्टलाईनची आणि सिमेंटचे ग्राऊंटीची कामे, तसेच गाळणी संयंत्रापासून दोन्ही जलतरण तलावांपर्यंतची जुनी जलवाहिनी बदलून नवीन जलवाहिनी टाकणे, जलतरण तलावावरील डेक क्षेत्राला नवीन फरशा तसेच लाद्या बसवणे, कपडे बदलण्याच्या खोल्यांमधील विद्यमान विभाजने काढून अल्युनियम फ्रेम केलेले विभाजने बसवणे, नळकामे करणे, सांडपाण्याच्या जुन्या वाहिन्या काढून नवीन वाहिन्या बसवणे, लोखंडी जाळ्या लावून संरक्षक भिंतीचे नुतनीकण व भिंतींना गिलावा करणे आदी कामांचा समावेश आहे. तसेच कपडे बदलण्याच्या खोलीसह इतर भागांमध्ये विद्युत कामांचा समावेश आहे. (Andheri Sports Complex Swimming Pool)

(हेही वाचा – Murder : नववीच्या विद्यार्थाची भोसकून हत्या, १९ वर्षीय तरुणाला अटक)

या कामांसाठी महापालिकेने जुलै २०२३ रोजी निविदा मागवली होती. यामध्ये केवळ दोनच निविदाकारांनी भाग घेतला. त्यात एक कंपनी बाद ठरल्यानंतर एकमेव पात्र ठरलेल्या कंपनीची निवड करण्यात आली. यामध्ये एकमेव पात्र ठरलेल्या एपीआय सिव्हीलकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकमेव असलेल्या कंपनीची निवड ही नियमाला धरून नसून स्पर्धात्मक निविदेसाठी किमान तीन निविदारांची आवश्यकता असते. परंतु दोन पैंकी एक निविदाकार अप्रतिसादात्मक ठरल्यानंतर एकमेव असलेल्या कंपनीला काम देण्यामागे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे. (Andheri Sports Complex Swimming Pool)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.