बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ या निवासस्थानावर हल्ल्यासाठी हल्लेखोरांनी वापरलेले पिस्तूल तापी नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस ताब्यात घेतले असून दुसरे पिस्तूलचा शोध घेण्यात येत आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल सूरत येथिल तापीच्या नदीच्या पात्रात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी मुंबई गुन्हे शाखेचे पथक गुजरात राज्यातील सूरत येथे दाखल झाले होते, त्यांनी पोहणाऱ्या पथकाच्या मदतीने सोमवारी सायंकाळी नदीच्या पात्रात एक पिस्तूल एक काडतुस ताब्यात घेतले आहे. (Salman Khan)
बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ या निवासस्थानी गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पथकाने गेल्या आठवड्यात गुजरात राज्यातील भुज येथून अटक केली होती. या हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर पळून जात असताना गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल सूरत येथे तापी नदीच्या पात्रात फेकून भुजकडे पळ काढला होता. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल हे न्यायालयात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी महत्त्वाचा पुरावा असल्यामुळे गुन्ह्यातील पिस्तूल ताब्यात घेणे महत्त्वाचे आहे. ही पिस्तूल शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून विशेष शोध मोहीम सोमवारी राबविण्यात आली होती. मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक आणि त्याचे पथक सोमवारी आरोपींना सोबत घेऊन सोमवारी सकाळी सूरत येथे दाखल झाले होते. (Salman Khan)
(हेही वाचा – Murder : नववीच्या विद्यार्थाची भोसकून हत्या, १९ वर्षीय तरुणाला अटक)
गोळीबार प्रकरणी ‘या’ हल्लेखोरांना केली होती अटक
हल्लेखोरांनी हल्ल्यात वापरलेले पिस्तूल पूलांवरून तापी नदीच्या पात्रात फेकल्याची माहिती दिल्यानंतर पोलिस पथकाने पोहणाऱ्याची मदत घेवून सकाळी तापी नदीच्या पात्रात पिस्तुलचा शोध सुरू केला होता, सायंकाळी उशिरा हल्ल्यातील पिस्तूल नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सलमान खान (Salman Khan) याच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने निखिल गुप्ता आणि सागर पाल या हल्लेखोरांना गुजरात राज्यातील भुज येथून अटक करण्यात आली होती. हे दोघे लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असून रविवारी पहाटे बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील गॅलक्सी आपर्टमेंट मोटारसायकल आलेल्या या दोघांनी गोळीबार करून पळ काढला होता. मुंबई गुन्हे शाखेने या दोघांचा माग काढत प्रथम या दोघांनी वापरलेली मोटारसायकल वांद्र्यातील माउंटमेरी येथून ताब्यात घेतली होती, त्यानंतर या मोटरसायकलच्या मालकाचा शोध घेतला असता ही मोटारसायकल पनवेल येथे राहणाऱ्या एका व्यक्तीकडून या दोघांनी विकत घेतल्याचे तपासात समोर आले होते. (Salman Khan)
तसेच हल्लेखोर हे पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे महिन्याभरापूर्वी भाड्याने राहत होते अशी माहिती तपासात समोर आली. गुन्हे शाखेने घरमालक, मोटारसायकल मालक आणि एजंटला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पोलिसांनी दोघांची ओळख पटवली होती. दरम्यान गुन्हे शाखेची विविध पथके गुजरात, युपी, मध्यप्रदेश येथे रवाना झाली होती. या दोघांचा शोध घेत असताना हे दोघे गुजरात राज्यातील भुज येथे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच सोमवारी रात्री भुज येथून दोघांना अटक करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी या हल्ल्यांतर दहिसर येथून गुजरतला जाणारी बस पकडली होती, त्यानंतर ही दोघे सूरत येथे उतरले व त्यांनी हल्ल्यात वापरलेली पिस्तूल तापी नदीच्या पात्रात फेकून भुज कडे रवाना झाले झाले होते. (Salman Khan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community