Lok Sabha Election 2024: नाशिकचा तिढा सुटण्याच्या मार्गावर, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला ‘हा’ निर्णय

240
Lok Sabha Election 2024: नाशिकचा तिढा सुटण्याच्या मार्गावर, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला 'हा' निर्णय
Lok Sabha Election 2024: नाशिकचा तिढा सुटण्याच्या मार्गावर, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला 'हा' निर्णय

गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अखेर हा तिढा सुटण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचं नाव जवळपास निश्चित झाले आहे, अशी माहिती शिंदे गटातील सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024)

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. नाशिकच्या जागेवरून मध्यरात्री ३ वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला श्रीकांत शिंदे, इच्छुक उमेदवार हेंमत गोडसे, , इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून हेमंत गोडसे यांना काम सुरू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदेश दिले आहेत. शिंदे गटाचे अजय बोरस्ते हे देखील इच्छुक उमेदवार होते.

(हेही वाचा – Sanjay Raut: ‘पूर्ण बरे होऊनच परत यावे…’ ‘या’ नेत्याने भरला संजय राऊतांचा येरवडा मनोरुग्णालयाचा फॉर्म )

नाशिकचा तिढा सोडवण्यात मुख्यमंत्र्यांना यश
छगन भुजबळांच्या माघारीनंतर ही जागा शिवसेना शिंदे गटाला (Shiv Sena Shinde Group)सुटेल, असे बोलले जात आहे, मात्र आता शिवसेना शिंदे गटातदेखील दोन गट पडले आहेत. एकीकडे खासदार हेमंत गोडसे यांनी अनेक वेळा ठाणे येथे जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या घरासमोर आंदोलने केली. तर शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नाशिकमधून लोकसभा (Nashik Lok Sabha Constituency) लढवण्याची तयारी दर्शवली होती. अखेर मुख्यमंत्र्यांना हा तिढा सोडवण्यात यश आले आहे. प्रचाराला कमी दिवस उरल्यानं बोरस्ते यांना थांबवून गोडसेच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण नवखा उमेदवार संपूर्ण मतदारसंघाचा प्रचार करु शकत नाही. हेमंत गोडसे गेल्या 10 वर्षापासून काम करत आहे. त्यांच्या प्रचाराची एक फेरी देखील पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आज किंवा उद्या घोषणा होण्याची शक्यता
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा जागेचा महायुतीमध्ये तिढा कायम होता. नाव जाहीर होत नसल्याने छगन भुजबळ यांनी चार दिवसांपूर्वी घेतली निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने जागा वाटप रखडले होते. आज किंवा उद्या गोडसेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. २ दिवसांत नाव जाहीर करण्याचे आश्वसन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाजपाचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.