- ऋजुता लुकतुके
कसोटीपासून सुरू झालेलं क्रिकेट आता टी-२० पर्यंत आलंय. क्रिकेटचे हे तीनही प्रकार अजून अस्तित्वात असले तरी स्वरुप दिवसें दिवस बदलतंय. एके काळचं धिमं क्रिकेट आता वेगवान होतंय. अशा क्रिकेटमध्ये हुकुमी षटकार खेचण्याची कला (Longest Six in Cricket History) ही संघासाठी एक मोलाचं कौशल्य ठरत आहे. षटकार खेचण्यासाठी नव नवीन फटकेही फलंदाज शोधून काढत आहेत. फलंदाजांनी फटकावलेला चेंडू छताला लागणं किंवा अगदी स्टेडिअमच्याही बाहेर भिरकावणं हे ही आता नियमित झालं आहे. (Longest Six in Cricket History)
षटकारामुळे संघाच्या धावसंख्येत ६ धावांची मोलाची भर तर पडतेच. शिवाय मैदानात उपस्थित असलेले चाहते खुश होतात ते वेगळंच. क्रिकेटची लोकप्रियताही त्यामुळे वाढीला लागते आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये युवराज सिंग, ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल यांची नावं मनसोक्त षटकार खेचण्यासाठी घेतली जातील. (Longest Six in Cricket History)
अगदी अलीकडे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने या हंगामातील सर्वात लांब षटकार खेचला तो १०८ मीटर लांब गेला. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याहून मोठे षटकार लगावले गेले आहेत. यात सगळ्यात आघाडीवर आहे तो पाकिस्तानचा माजी स्टार फलंदाज शाहीद आफ्रिदीने लगावलेला षटकार. या षटकारानंतर चेंडूने तब्बल १५३ मीटरचं अंतर कापलं होतं. जागतिक क्रिकेटमधील अव्वल दहा षटकार इथं बघूया. यात दोन भारतीय नावं आहेत ती युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोणी यांची. (Longest Six in Cricket History)
(हेही वाचा- PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?)
क्रमांक |
फलंदाज |
संघ |
अंतर (मीटरमध्ये) |
वर्ष |
१ |
शाहीद आफ्रिदी |
पाकिस्तान |
१५३ मी |
२०१३ |
२ |
ब्रेट ली |
ऑस्ट्रेलिया |
१३० मी |
२००५ |
३ |
मार्टिन गपटिल |
न्यूझीलंड |
१२७ मी |
२०१२ |
४ |
कोरे अँडरसन |
न्यूझीलंड |
१२२ मी |
२०१४ |
५ |
लियम लिव्हिंगस्टोन |
इंग्लंड |
१२२ मी |
२०२१ |
६ |
मार्क वॉ |
ऑस्ट्रेलिया |
१२० मी |
१९९९ |
७ |
युवराज सिंग |
भारत |
११९ मी |
२००७ |
८ |
महेंद्र सिंग धोणी |
भारत |
११८ मी |
२००८ |
९ |
शाहीद आफ्रिदी |
पाकिस्तान |
११७ मी |
२००५ |
१० |
ख्रिस गेल |
वेस्ट इंडिज |
११६ मी |
२०१० |
हेही पहा-
Join Our WhatsApp Community