मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांना अटक करण्याचे षडयंत्र होते, असा आरोप सोमवारी २२ एप्रिलला केला. या आरोपांना शिवसेना उबाठा (UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दुजोरा दिला आहे. (Eknath Shinde)
(हेही वाचा- PUNE: घरून मतदान करणाऱ्यांसाठी मंगळवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस, काय आहेत आयोगाचे आदेश?)
केंद्रात सरकार आल्यास कारवाई
मंगळवारी २३ एप्रिलला पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी शिंदे यांनी केलेले आरोप खरे असल्याचे स्पष्ट केले. तसेच इंडी आघाडीचे सरकार केंद्रात आल्यास फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. (Eknath Shinde)
षडयंत्र खरे आहे
राऊत म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री आणि गृह खाते सांभाळत असताना त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन पोलीस खात्याकडून टॅप केले जे बेकायदेशीर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारने फडणवीस यांची चौकशी सुरू केली होती आणि त्यांना अटकेची भीती होती, असे सांगून अटकेचे षडयंत्र खरे असल्याचे मान्य केले. (Eknath Shinde)
(हेही वाचा- IPL 2024, MI vs RR : रोहित शर्माचा पहिल्याच षटकांत बळी गेला आणि गोलंदाजाच्या नावावर लागला हा विक्रम)
शिंदे यांना ‘क्लीन चिट’
“भाजपा नेते फडणवीस (Devendra Fadnavis), गिरीशी महाजन, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, प्रसाद लाड हे काही अस्पृश्य आहेत का? या देशात राज्यपाल, मुख्यमंत्री अनेक मंत्री, खासदार, आमदारांवर कारवाई झाली. त्याकाळात फडणवीस यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप होता,” असे राऊत म्हणाले. तसेच आतापर्यंत शिंदे यांनी गद्दारी केली अशी ओरड करणाऱ्या उबाठाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर दबाव आणून शिवसेनेचे ४० आमदार फोडल्याचा आरोप केला. असे सांगून राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे यांना गद्दारी केल्याच्या आरोपात ‘क्लीन चिट’ दिली. (Eknath Shinde)
(हेही वाचा- Deepak Kesarkar: विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ बदलण्याबाबत आचारसंहितेनंतर निर्णय देणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन)
केंद्रात इंडी आघाडीचे सरकार लोकसभा निवडणुकीनंतर येईल आणि ज्या चौकशा रद्द केल्या गेल्या त्या चौकशा पुन्हा सुरू होतील आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असे राऊत म्हणाले. (Eknath Shinde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community