Lok Sabha Election 2024: अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा

पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत.

151
Lok Sabha Election 2024: अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' सुरक्षा

सध्या देशासह राज्यात निवडणुकीचे वातावरण असून पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतलेले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळेच त्यांचे कुटुंबीय प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हेदेखील पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. त्यांना आता थेट वाय प्लस दर्जाची सुरक्षा (Parth Pawar Y Plus Security)देण्यात आली आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे. (Lok Sabha Election 2024)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ४ दिवसांपूर्वीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Deepak Kesarkar: विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ बदलण्याबाबत आचारसंहितेनंतर निर्णय देणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन )

सुरक्षेची केली होती मागणी…
पवार कुटुंबातील युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या गटात आहेत. ते राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी प्रचारासाठी गेल्यानंतर लोकांनी घेराव घातला होता. अजित पवार यांच्या नावे चुकीचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत, असा दावा या लोकांनी केला होता. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार तसेच रोहित पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

राज्य शासनानेच दिली सुरक्षा…
एकीकडे पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली आहे, पण दुसरीकडे मात्र राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.