Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यात ८ जागांवर मतदान; कोणत्या पक्षाचा कुठे आहे बोलबाला?

191
Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यात ८ जागांवर मतदान; कोणत्या पक्षाचा कुठे आहे बोलबाला?

यूपीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. दुसऱ्या टप्प्यात अमरोहा, मेरठ, बागपत, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ आणि मथुरा येथे मतदान होणार आहे. या टप्प्यात अमरोहा वगळता इतर सर्व जागा भाजपाने जिंकल्या होत्या. या जागांवर यावेळी पुन्हा एनडीए आणि इंडी आघाडीत चुरशीची स्पर्धा आहे. दोन्ही बाजूंनी अनेक दिग्गज रिंगणात आहेत.

अमरोहामध्ये मुस्लिम मतांचे विभाजन 

यूपीच्या अमरोहामधून भाजपाने यंदाच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) कंवर सिंग तन्वर यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेस-सपा युतीचे दानिश अली आणि बसपाचे मुजाहिद हुसेन यांच्यात लढत आहे. ही जागा मुस्लिमबहुल जागा आहे. त्यामुळे बसपा आणि इंडी आघाडी या दोन्ही पक्षांकडे मुस्लिम उमेदवार असल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होणे निश्चित आहे. दुसरीकडे, आरएलडीमुळे रालोआ मजबूत झाला आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis: तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल)

मेरठमध्ये अरुण गोविल यांचे आकर्षण 

मेरठमध्ये रामायण या प्रसिद्ध मालिकेत भगवान रामाच्या भूमिकेत दिसलेल्या अरुण गोविल यांना भाजपाने निवडणुकीच्या रिगणात उतरवले आहे. आजही त्यांच्याबद्दल लोकांमध्ये तीच भावना दिसून येत आहे. तर बसपाने देवव्रत त्यागी यांना तिकीट दिले असून सपाने सुनीता वर्मा यांना तिकीट दिले आहे. मेरठ ही जागा यापूर्वी भाजपाकडे होती.

गाझियाबाद भाजपासमोर आव्हान  

गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) दोन वेळा खासदार राहिलेले व्हीके सिंह यांचे तिकीट रद्द करून भाजपाने अतुल गर्ग यांना उमेदवारी दिली आहे. तर आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहेत. काँग्रेसने येथून डॉली शर्मा यांना तिकीट दिले आहे. तर बसपाकडून नंदकिशोर पुंडीर हे रिंगणात आहेत.

गौतम बुद्ध नगरमध्ये विद्यमान खासदाराला पुनः संधी  

सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या डॉ. महेश शर्मा यांना भाजपाने गौतम बुद्ध नगर मतदारसंघातून पुन्हा तिकीट दिले आहे. बसपाकडून राजेंद्र सोळंकी रिंगणात आहेत, तर समाजवादी पक्षाने महेंद्र नगर यांना या जागेवरून तिकीट दिले आहे. तिन्ही उमेदवार वेगवेगळ्या जातीतील असल्याने या जागेवरील लढत रंजक आहे.

बुलंदशहर भाजपाचा गड 

बुलंदशहर ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. ही जागाही गेल्या दोन टर्मपासून भाजपाच्या ताब्यात आहे. भाजपाने येथून पुन्हा भोला सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर सपा-काँग्रेस आघाडीचे शिवराम वाल्मिकी आणि बसपा यांनी गिरीश चंद्र यांच्यावर बाजी लावली आहे. २००९ वगळता भाजपा १९९१ पासून येथे सातत्याने विजयी होत आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Salman Khan Firing Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकने शोधली दुसरी पिस्तुल आणि ४ मॅगझीन)

अलीगडमध्ये मुस्लिम मते निर्णायक 

अलिगड लोकसभा जागेवरही भाजपाचीच पकड आहे. भाजपाने विद्यमान खासदार सतीश गौतम यांनाच तिकीट दिले आहे. येथे बसपाने मुस्लिम उमेदवार गुफरान नूर यांचे तिकीट रद्द करून भाजपाचे हितेंद्र कुमार यांना तिकीट दिले आहे. समाजवादी पक्षाकडून जाट समाजाचे बिजेंद्र सिंह रिंगणात आहेत. या जागेवरही मुस्लीम मतदार निर्णायक भूमिका बजावतात, मात्र तिन्ही पक्षांपैकी एकाही पक्षाने मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही. (Lok Sabha Election 2024)

मथुरामधून हेमा मालिनी हॅट्रिक मारणार 

मथुरा लोकसभा जागा ही व्हीव्हीआयपी जागा मानली जाते. चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी सलग दोन वेळा या मतदारसंघातून खासदार आहेत. यावेळीही त्या भाजपाच्यावतीने निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने येथून मुकेश धनगर यांना तिकीट दिले आहे. बहुजन समाज पक्षाने जाट समाजातील माजी आयआरएस उमेदवार सुरेश सिंह यांना उमेदवारी दिली आहे. सीएम योगी यांनी मथुरा मतदारसंघातूनच आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करताना काशी आणि अयोध्यानंतर आता मथुरेची पाळी असल्याचे म्हटले होते. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.