-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) संघा दरम्यानचा सामना सुरूही होण्यापूर्वी मुंबई संघासमोर अनपेक्षित अडथळा निर्माण झाला होता. जयपूरच्या रहदारीत मुंबई इंडियन्स संघाची बस विचित्र पद्धतीने अडकली. पण, संघाच्या मदतीला धावून आला तो मुंबई पलटनचा एक चाहता. मुंबई संघ प्रशासनानेच हा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकून या चाहत्याचे आभार मानले आहेत. ‘सनी भाई’ असं या चाहत्याचं नाव आहे. (IPL 2024)
प्रसिद्ध झालेल्या व्हीडिओत हा चाहता बसच्या चालकाशीही संवाद साधताना दिसतो. शिवाय रस्त्यावरील गर्दीलाही आवर घालून बसला वाट करून देताना दिसतो. बाकीचे चाहते मात्र खेळाडूंना हात दाखवणे आणि फोटो काढणे यात मशगुल आहेत. सनीभाईंनी केलेल्या मदतीमुळे मुंबई इंडियन्स खेळाडू मात्र हात वर करून सनीभाईंचे आभार मानताना दिसतात. खास करून रोहित आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या चेहऱ्यावर या मदतीसाठीचं कौतुक स्पष्ट दिसतं.
(हेही वाचा – Devendra Fadnavis: तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल)
Dil jeet liya Sunny bhai 🥹#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #RRvMI pic.twitter.com/TzY2YRjCMK
— Mumbai Indians (@mipaltan) April 22, 2024
अखेर या सामन्यात राजस्थान रॉयल्सनी मुंबई इंडियन्सचा ९ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला. मुंबईने समोर ठेवलेलं १८० धावांचं आव्हान राजस्थानने एकोणिसाव्या षटकात पूर्ण केलं. आणि यात यशस्वी जयसवालने ६० चेंडूंत १०४ धावांची खेळी साकारली. या हंगामातील यशस्वीचं हे पहिलंच शतक. राजस्थान संघाने आतापर्यंतच्या ८ सामन्यांत ७ विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखलं आहे. तर मुंबईचा ७ सामन्यातील हा चौथा पराभव होता. ते सातव्या स्थानावर आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community