- ऋजुता लुकतुके
राजस्थान रॉयल्सचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जयसवालचं शतक आणि संदीप शर्माचे ५ बळी यांच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने मुंबईचा ९ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला. संदीपचं गोलंदाजीचं पृथ्थकरण ४-०१८-५ हे आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वोत्तम ठरलं आहे. तर यशस्वीनेही ६० चेंडूंत नाबाद १०४ धावा केल्या. मुंबई संघाचा ८ सामन्यातील हा पाचवा पराभव होता. आणि संघासाठी धोक्याची घंटा म्हणजे संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही खात्यांत कमी पडला. (IPL 2024 MI Lose)
The @rajasthanroyals sign off from Jaipur in style with plenty to celebrate 💗🥳
Scorecard ▶️ https://t.co/Mb1gd0UfgA#TATAIPL | #RRvMI pic.twitter.com/kW9mOqYNfU
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2024
राजस्थान रॉयल्ससाठी हा ८ सामन्यांतील सातवा विजय होता. त्याचबरोबर त्यांनी गुणतालिकेतील अव्वल स्थानही भक्कम केलं आहे. (IPL 2024 MI Lose)
The @rajasthanroyals sign off from Jaipur in style with plenty to celebrate 💗🥳
Scorecard ▶️ https://t.co/Mb1gd0UfgA#TATAIPL | #RRvMI pic.twitter.com/kW9mOqYNfU
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2024
(हेही वाचा – Eknath Shinde यांचा घातपात करण्याचा मविआ सरकारचा डाव?; राजू वाघमारेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा)
‘टीमका कप्तान कैसा हो? रोहित शर्मा जैसा हो’
हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सामन्यानंतर संघाचा पराभव मान्य केला. पण, लगेचच पराभवाचं खापर कुणावर फोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. ‘सगळे खेळाडू व्यावसायिक आहेत. कुठे चुका झाल्या ते सगळ्यांना कळतंय. त्यामुळे आताच त्याविषयी बोलायला नकोय. चुका शोधून काढून त्यातून शिकणं आणि त्या पुन्हा होऊ न देणं, हेच महत्त्वाचं असल्याचं हार्दिक म्हणाला. (IPL 2024 MI Lose)
संपूर्ण सामन्याचा आढावा धेता संघाला १०-१५ धावा कमी पडल्या असं हार्दिकला वाटतं. ‘सुरुवातीलाच आम्ही थोडे संकटात सापडलो होतो आणि त्यानंतर तिलक, नेहल यांनी खूप सुरेख फलंदाजी केली. पण, तरीही डावाचा शेवट चांगला करण्यात आम्हाला अपयशच आलं. त्यामुळे संघाला १०-१५ धावा कमी पडल्या. एकूणच सामन्यात आम्ही आमचा योग्य पाय पुढे ठेवू शकलो नाही,’ असं शेवटी हार्दिक म्हणाला. (IPL 2024 MI Lose)
रोहित शर्माला बाजूला सारून या हंगामात मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने हार्दिककडे नेतृत्व सोपवलं. पण, त्यानंतर हार्दिकला (Hardik Pandya) खूप साऱ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. आताही जयपूरमध्ये मुंबईच्या चाहत्यांनी ‘टीमका कप्तान कैसा हो? रोहित शर्मा जैसा हो,’ असे नारे दिले होते. (IPL 2024 MI Lose)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community