Indian Team T20 World Cup : भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून हरभजनची ‘या’ खेळाडूला पसंती

Indian Team T20 World Cup : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज या जागेसाठी सध्या भलतीच चुरस आहे. 

199
Indian Team T20 World Cup : भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून हरभजनची 'या' खेळाडूला पसंती
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या आयपीएल (IPL) हंगामानंतर लगेचच काही दिवसांत अमेरिका आणि वेस्ट इंडिज इथं टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या संघ निवडीसाठी नाही म्हटलं तरी आयपीएल हा एक निकष असेल. आतापर्यंतची स्पर्धा पाहता भारतीय संघात (Indian Team) यष्टीरक्षक फलंदाज या जागेसाठी जोरदार चुरस दिसत आहे. जितेन शर्मा, ध्रुव जुरेल हे आधीच भारतीय संघातून खेळले आहेत. त्या व्यतिरिक्त रिषभ पंत, संजू सॅमसन आणि दिनेश कार्तिक यांनीही या हंगामात जोरदार कामगिरी केली आहे. (Indian Team T20 World Cup)

पण, या सगळ्यांमध्ये तुझी पसंती कुणाला हा प्रश्न माजी फिरकीपटू हरभजन सिंगला (Harbhajan Singh) विचारताच त्याने, ‘कोई शक? माझी पसंती राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनलाच असेल,’ असं ठणकावून सांगितलं. ‘दर्जा कायम असतो, फॉर्म येत जात राहतो, हे पुन्हा एकदा संजू सॅमसनने सिद्ध केलं आहे. त्याची मुंबई विरुद्धची खेळी हेच दाखवून देते की, सातत्य आणि आत्मविश्वास असेल तर काय कमाल होऊ शकते. तेव्हा भारतीय संघात (Indian Team) वर्णी लागण्यासाठी संजू सॅमसनला फारशी अडचण भासू नये,’ असं हरभजन सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे. (Indian Team T20 World Cup)

(हेही वाचा – IPL 2024 MI Lose : मुंबई इंडियन्सच्या पाचव्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या काय म्हणतो?)

संजू सॅमसन सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर आहे. ८ सामन्यांत त्याने १५२ च्या स्ट्राईक रेटने ३१४ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. शिवाय त्याने राजस्थान रॉयल्स संघाचं सक्षम नेतृत्व करताना संघाला ८ सामन्यांत ७ विजयही मिळवून दिले आहेत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सॅमसनची चुरस असेल ती के एल राहुल, इशान किशन आणि रिषभ पंत यांच्याशी. राहुलने ७ सामन्यांत २८६ धावा केल्या आहेत. तर दुखापतीतून सावरलेल्या पंतने ८ सामन्यांत २५४ धावा केल्या आहेत. (Indian Team T20 World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.