- ऋजुता लुकतुके
रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी ही करपूर्व नफा १ लाख कोटी रुपये इतका नोंदवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा ७ टक्क्यांनी वाढून तो ७९,०२० कोटींवर गेला आहे. इतकंच नाही तर कंपनीने पहिल्यांदाच वार्षिक महसूलाच्या बाबतीतही १० लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. ३१ मार्चला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा ईबिटा नफा म्हणजे कर भरण्यापूर्वीचा निव्वळ नफा हा १.७९ लाख कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे. (Reliance Q4 Results)
या कामगिरीमुळे खुश होऊन कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आपल्या समभागधारकांना प्रती शेअर १० रुपयांचा लाभांशही देऊ केला आहे. रिलायन्स (Reliance) कंपनीने सोमवारी शेअर बाजाराची वेळ संपल्यानंतर २०२४ आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीचे आपले निकाल जाहीर केले. यात कंपनीच्या मूलभूत तेल उद्योगातून कंपनीला झालेल्या नफ्यामुळे या तिमाहीतील कंपनीचा नफा २१,२४३ कोटी रुपयांनी वाढल्याचं समोर आलं आहे. (Reliance Q4 Results)
(हेही वाचा – Vehicle Parking : मुंबई पोलीस आयुक्तालयासमोरच वाहन चालकांची लूट; विनामूल्य पार्किंगतळावर पार्किंग माफियांचा कब्जा)
पर्यावरणपूरक इंधनाच्या क्षेत्रात कंपनी गुंतवणूक करणार – मुकेश अंबानी
‘चौथ्या तिमाहीत जगभरात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढलेली मागणी यामुळे रिलायन्सच्या तेल उद्योगालाही फायदा झाला आहे. त्यामुळे कर भरण्यापूर्वीचा कंपनीचा नफा हा पहिल्यांदाच १ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचला आहे. शिवाय इतर क्षेत्रातही खर्च कसा आटोक्यात ठेवता येईल यावर आम्ही धोरणात्मक विचार केला. त्याचाही फायदा कंपनीला झाला आहे,’ असं रिलायन्स (Reliance) उद्योग समुहाचे संचालक मुकेश अंबानी यांनी तिमाही निकाल जाहीर करताना म्हटलं. (Reliance Q4 Results)
तेल उद्योगाबरोबरच डिजिटल बिझिनेसनेही चांगली वाढ दाखवून दिल्याचं अंबानी यांनी सांगितलं. रिलायन्स जिओचा निव्वळ नफा हा १२ टक्क्यांनी वाढून ५,५४३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यात टेलिफोन सेवेचा विस्तार, वाढलेली ग्राहक संख्या यांचा हात होता. तर रिलायन्स (Reliance) रिटेल उद्योगातही १८ टक्के वाढ होऊन हा नफा ५,६३२ कोटी रुपये इतका होता. इथून पुढे पर्यावरणपूरक इंधनाच्या क्षेत्रात कंपनी गुंतवणूक करणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. (Reliance Q4 Results)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community