Goa : गोव्यातील ख्रिश्चनांनो, इस्लामिक कट्टरवाद्यांपासून वाचवण्यासाठी मोदींना पाठिंबा द्या; गोव्यात पोस्ट व्हायरल

230
गोव्यात (Goa) लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या ठिकाणी कॉँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना ख्रिश्चन समुदायामधून x वरील पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही पोस्ट सॅविओ फर्नांडिस यांची असून ती पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.

काय म्हटले फर्नांडिस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये?  

केरळमधील इस्लामिक कट्टरवाद्यांच्या निर्दयतेपासून ख्रिश्चन मुली आणि मुलांना वाचवायचे असेल तर लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दिला पाहिजे, हे केरळमधील कॅथोलिक चर्चच्या नेत्यांना लक्षात आले आहे. भारत सरकार आणि चर्चचे प्रमुख यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले आहेत. मला आशा आहे की, गोव्यातील चर्चच्या नेत्यांनी राज्यातील इस्लामिक कट्टरतावादाच्या हळूहळू वाढणारे प्रस्थ लक्षात घ्यायला पाहिजे. पीएफआय सध्या तटस्थ आहे, परंतु ते लवकरच वेगळ्या चेहऱ्यासह त्याचे कुरूप स्वरूप समोर येईल. इस्लामिक कट्टरतावादाशी लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे.

(हेही वाचा MNS : मनसेचा महायुतीच्या ‘या’ उमेदवारांना विरोध; प्रचार करण्यास नकार)

ही पोस्ट गोव्यात (Goa) जोरदार चर्चेत आली आहे. समस्त ख्रिश्चन समाजाला लोकसभा निवडणुकीत भूमिका ठरवण्यासाठी या पोस्टच्या द्वारे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये ख्रिश्चन समुदायाला इस्लामिक दहशतवादाचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. जसे केरळमध्ये ख्रिश्चन समुदाय इस्लामिक दहशतवादाचा बळी ठरत आहे, तसा गोव्यातही ख्रिश्चन समुदायाला सहन करावे लागेल, अशी भीती यानिमित्ताने व्यक्त होत आहे. या पोस्टला ख्रिश्चन समुदायाकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.