दक्षिण मुंबईतील जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नसून महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. प्रत्यक्षात हा मतदार संघ कुणाच्या वाट्याला जाणार याबाबतच स्पष्टता नसल्याने शिवसेना आणि भाजपाच्यावतीने या जागेवर दावा केला जात आहे. परंतु या जागेवर भाजपाने पक्का दावा केला असला तरी ही जागा शिवसेनेसाठी किती महत्वाची आहे आणि धनुष्यबाण चिन्हाचा किती मोठा परिणाम होईल याची समीकरणेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रत्येक शाखा, विविध संस्था, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी भेटी देत प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु सावंत यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली असली तरी अद्यापही महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरेना. या मतदार संघावर भाजपाने पक्का दावा करत याठिकाणाहून विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा होती. नार्वेकर यांच्या पाठोपाठ या मतदार संघात उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)
(हेही वाचा – North West Lok Sabha Constituency : भाऊ फक्त सही शिक्क्यांपुरतेच, भैयाच करतात काम)
अद्यापही या मतदार संघाच्या वाटपाबाबत ठोस निर्णय नाही
मात्र, या लोकसभेवर शिवसेनेनेही दावा ठोकला असून या मतदार संघात माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हा मतदार संघ कुणाकडे असा प्रश्न पडलेला आहे. एकाबाजुला भाजपने आपला दावा ठोकलेला असतानाच शिवसेनेनेही आपला हक्क सोडलेला नाही. मात्र, हा मतदार संघ शिवसेनेसाठी कशाप्रकारे महत्वाचा आहे. आणि धनुष्यबाण चिन्ह कशाप्रकारे परिणाम करेल हे पटवून देण्यात आला आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)
धनुष्यबाण चिन्हावर या मतदार संघात निवडणूक लढवल्यास शिवडी आणि वरळी, भायखळा तसेच मुंबादेवी विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणात परिणाम करेल आणि युती असल्याने कुलाबा, मलबार हिल या विधानसभा क्षेत्रातही भाजपाची पक्की मतेही युतीचा उमेदवार म्हणून धनुष्यबाण चिन्ह असलेल्या उमेदवाराला सहज मिळेल अशाप्रकारची समीकरणे भाजपाच्या नेत्यांना शिवसेनेने पटवून दिली आहे. त्यामुळे या मतदार संघात धनुष्यबाण चिन्हाचा फायदा होणार असल्याचे पटवून दिले असले तरी अद्यापही या मतदार संघाच्या वाटपाबाबत ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, आमदार यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या बैठकीत काय घडले ही बाब समोर आली नसली तरी या जागेवर शिवसेनेचाही दावा तितकाच असल्याचेही दिसून येत आहे. (South Mumbai Lok Sabha Constituency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community