Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, चार मेगा टर्मिनस उभारणार!

2864
Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, चार मेगा टर्मिनस उभारणार!
Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, चार मेगा टर्मिनस उभारणार!

सर्वसामान्यांचा रेल्वेप्रवास (Central Railway) आरामदायी होण्याकरीता यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित झालेल्या शून्य प्रतीक्षायादीचे ध्येय गाठण्यासाठी भारतीय रेल्वेने पावले टाकली आहेत. मध्य रेल्वेवर (Central Railway) चार ठिकाणी मेगा टर्मिनस उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यासाठी महामुंबईतील सहा ठिकाणी जागेचा शोध सुरू झाला असून, शहरात जागेची अडचण आल्यास विकसित होत असलेल्या शहरांचा पर्यायही खुला ठेवण्यात आला आहे. (Central Railway)

महामुंबईत सध्याची रेल्वे टर्मिनस वगळता नवीन चार मेगा टर्मिनस

भारतीय रेल्वे मंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशातील सर्व क्षेत्रीय रेल्वेच्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सध्याच्या उन्हाळी सुट्टीतील प्रवासी गर्दीबाबत दीर्घकालीन उपाय करण्याबाबत चर्चा झाली. महामुंबईतून प्रवासी मागणी वाढती आहे. यामुळे महामुंबईत सध्याची रेल्वे टर्मिनस वगळता नवीन चार मेगा टर्मिनस उभारण्यासाठी पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे आणि परळ या संभाव्य ठिकाणी जागेची चाचपणी सुरू आहे. मात्र, अद्याप सलग जागा उपलब्ध झालेली नाही. (Central Railway)

(हेही वाचा –Lok Sabha Election Phase 2: निवडणुकीचा दुसरा टप्पा! शेवटच्या दिवशी राज्यात अनेक नेत्यांच्या प्रचारसभा)

टर्मिनसमधील रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी सलग जागेची गरज आहे. चाचपणी सुरू असलेल्या ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी बांधकामे आहेत. सहा ठिकाणांमध्ये सध्या भूसंपादनाचे मोठे आव्हान आहे. यामुळे विकसित होत असलेली शहरे अर्थात पनवेल, बदलापूर, टिटवाळा किंवा त्यापलीकडील शहरांचा पर्यायही खुला ठेवण्यात आला आहे. जागेची निश्चिती झाल्यावर भूसंपादनानुसार प्रकल्प खर्च निश्चित होणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Central Railway)

(हेही वाचा –Wedding Gold Necklace Design: लग्नाची खरेदी करताय? दागिने निवडताना गोंधळ होतोय? वाचा काही सोप्या टिप्स)

मध्य रेल्वेच्या (Central Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादरमधून रोज सुमारे ३०० मेल-एक्स्प्रेस देशाच्या कानाकोपऱ्यात धावतात. दिवसागणिक प्रवासीसंख्या वाढती आहे. यामुळे नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याचे रेल्वे मंडळाचे नियोजन आहे. सध्याच्या टर्मिनसमध्ये नव्या रेल्वेगाड्या सामावून घेण्याची क्षमता नाही. यावर उपाय म्हणून मेगा टर्मिनसचे नियोजन असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Central Railway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.