- ऋजुता लुकतुके
बजाज ही देशातील अग्रगण्य दुचाकी कंपनी आपली पल्सर श्रेणीतील नवीन बाईक बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीची आतापर्यंतची सगळ्यात वेगवान बाईक अशी जाहिरातच कंपनीने केली आहे. आणि गाडीच्या लाँचचा मूहूर्त ठरला आहे ३ मेचा. बजाज पल्सर एनएस४०० (Bajaj Pulsar 400) असं तिचं अधिकृत नाव आहे. आणि बाईकचं डिझाईन हे एनएस २०० या जुन्या पल्सर बाईकवरच आधारित असेल. कंपनीने सोशल मीडियावर टाकलेल्या पहिल्या टिझरमध्ये बाईकचा वेग आणि ४०० सीसी क्षमतेचं इंजिन यावर भर देण्यात आला आहे.
From crafting the finest two-wheelers for the nation to becoming the most loved motorcycle brand in 70 countries, Bajaj Auto has come a long way. With our exports surpassing 2 million vehicles this year, we are delighted to be the #WorldsFavouriteIndian.https://t.co/Wc0fHOg2O4
— Bajaj Auto Ltd (@_bajaj_auto_ltd) January 23, 2019
(हेही वाचा – Bank Fraud : सरकारच्या ‘या’ विभागाच्या बँक खात्यावरून एका महिन्यात हडपले १ कोटी १६ लाख)
बजाज कंपनीने पहिल्यांदा इतक्या मोठ्या क्षमतेचं इंजिन असलेली बाईक बाजारात आणली आहे. त्यामुळे कंपनीसाठीही पल्सरची ही नवीन श्रेणी महत्त्वाकांक्षी असेल. केटीएम ड्युक ३९० या प्रतिस्पर्धी बाईकशी मिळतं जुळतं असं डिझाईन आणि इंजिन असेल असं बोललं जातंय. त्यामुळे इंजिनातून ४० बीएचपी इतकी शक्ती निर्माण होऊ शकेल. आणि टॉर्क ३५ एनएमच्या आसपास असेल. बाईकमध्ये ६ स्पीडचा गिअरबॉक्स असेल. (Bajaj Pulsar 400)
एलईडी दिवे आणि डिजिटल पॅनल असलेली बजाजची ही पहिलीच बाईक असेल. शिवाय हा डिजिटल डिस्प्ले ब्लूटूथने मोबाईल फोनलाही जोडता येईल. त्यामुळे पत्ता शोधणे, गाणी ऐकणे ही कामं बाईक चालवतानाही शक्य होतील. आधीच्या पल्सर बाईकच्या तुलनेत रंग आणि ग्राफिक्सही अधिक आकर्षक असतील. अशा या नवीन पल्सर बाईकची किंमत २ लाखांपासून सुरू होईल. (Bajaj Pulsar 400)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community