रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि महाविकास आघाडीकडून विनायक राऊत हे आमनेसामने आहेत. भाजपाचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी माध्यमांशी बोलताना विनायक राऊत (Vinayak Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. “या लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना कायमची सुट्टी मिळेल, कारण त्यांच्याकडे आमदार-खासदार कोणीही राहणार नाही.” असे नारायण राणे (Narayan Rane) यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे? (Narayan Rane)
“अनेक लोकांना मी भेटत आहे. लोक मला एकच सांगत आहेत की, यावेळी तुम्हाला मतदान करायला मिळणार, हे आमचे (Narayan Rane) नशीब आहे. असे उद्गार लोकांचे मला ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे मी खुश आहे. ४ जून रोजी जो निकाल लागेल, त्यामध्ये अडीच ते तीन लाखांच्या मताधिक्यांनी विजय मिळेल.” असा विश्वास नारायण राणे (Narayan Rane) यांनी यावेळी व्यक्त केला.
विनायक राऊतांवर टीकास्त्र
“मी (Narayan Rane) आता दिल्लीत कॅबिनेट मंत्री आहे आणि पुन्हा निवडून आलो तर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. पण त्यांना काय मिळणार? या निवडणुकीत आमचे खासदार ४०० पर्यंत जाणार आणि पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, मग दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार? कोकणात पूर येतो, दहा वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, असा कोणता प्रश्न विनायक राऊत यांनी सोडवला नाही. त्यामुळे हे प्रश्न आधी सोडवा. अडीच लाख कशाला म्हणतात? उमेदवारी अर्ज भरला तेव्हा जेमतेम अकाराशे लोक होते.” अशी टीका नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर केली. (Narayan Rane)
उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल
“या निवडणुकीत शिवसेनेचा एकही खासदार येणार नाही. लोकसभा निवडणूक झाली की १६ पैकी १० आमदार शिंदेंकडे जातील. मग सहा राहतील. त्यापैकी किती येतील हे माहिती नाही. पुढच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल. कारण, निवडणुकीनंतर आमदार, खासदार कोणहीही राहणार नाही.” असा निशाणा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला. (Narayan Rane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community