उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आदित्यनाथ म्हणाले, (Yogi Adityanath) “काँग्रेसने (Congress) त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात देशात ‘शरिया कायदा’ (Sharia law) लागू करण्याची आणि देशाचं विभाजन करण्याची इच्छा मांडली आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आपल्या देशाशी गद्दारी केली आहे. आणखी एकदा गद्दारी करण्यासाठी त्यांनी खोटी आश्वासनं देणारे जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत.” असं उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील भाजपच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी टीका केली आहे. (Yogi Adityanath)
आम्ही शरिया कायदा लागू करू
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले, “तुम्ही एकदा काँग्रेसचा निवडणुकीचा जाहीरनामा पाहा, त्यात त्यांनी म्हटलंय की देशात आमचं सरकार आल्यावर आम्ही शरिया कायदा लागू करू. अता मला तुम्हीच सांगा आपला हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानावर चालणार आहे की शरिया कायद्याने चालणार? काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात असं आश्वासन दिलंय कारण मोदींनी ट्रिपल तलाकची प्रथा रोखली आहे.” (Yogi Adityanath)
काँग्रेसवाल्यांची तुमच्या संपत्तीवर नजर आहे
“काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलं आहे की, त्यांचं सरकार आलं तर ते जनतेची संपत्ती ताब्यात घेऊन त्याचं वाटप करणार. मला जनतेला विचारायचं आहे की, तुम्ही काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला तुमच्या संपत्तीवर दरोडा टाकण्याची सूट देणार आहात? एका बाजूला या काँग्रेसवाल्यांची तुमच्या संपत्तीवर नजर आहे आणि दुसऱ्या बाजूला माफिया आणि गुन्हेगारांना आपल्या गळ्यातील ताईत बनवून ते राज्यात फिरतायत.” (Yogi Adityanath)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community