-
ऋजुता लुकतुके
भारताचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या (Yashaswi Jaiswal) आयुष्यात सोमवारचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा होता. आयपीएलमध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने ६० चेंडूंत १०४ धावांची खेळी केली. आणि खेळी पाहायला साक्षात दिग्गज डावखुरे फलंदाज ब्रायन लारा हजर होते. एकतर या हंगामात यशस्वीने खेळलेली ही पहिली मोठी खेळी होती. आणि ब्रायन लाराशी (Brian Lara) त्याची भेट पहिल्यांदाच होत होती. त्यामुळे सामना संपला तेव्हा यशस्वीने अक्षरश: चातकासारखी लारा यांच्याकडे झेप घेतली.
ब्रायन लारा (Brian Lara) तेव्हा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनशी बोलत उभे होते. पण, यशस्वी धावत त्यांच्या दिशेनं गेला आणि त्याने लारा यांना मिठी मारली. ‘शेवटी आपली भेट झालीच,’ असं तेव्हा यशस्वी जवळ जवळ ओरडलाच. लारानेही हसत हसत यशस्वीचं आलिंगन स्वीकारलं. राजस्थान रॉयल्स संघाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘लाराला भेटायला एवढ्या उत्कंठेनं कोण आलं पाहिलंत का?’ असा मथळा त्यांनी या व्हिडिओला दिला आहे. (IPL 2024)
(हेही वाचा – Prakash Ambedkar: कोण पृथ्वीराज चव्हाण? प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर खरमरीत टीका)
Look who came running to Brian Lara after a match-winning 100 💗💗 pic.twitter.com/BvuLweLolG
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 23, 2024
ब्रायन लारानेही (Brian Lara) यशस्वीचं कौतुक केलं आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तो आताच तयार असल्याचं म्हटलं आहे. यशस्वीने मुंबई विरुद्धच्या शतकाचं श्रेय आपले संघ सहकारी आणि कर्णधार संजू सॅमसनला दिलं. ‘माझ्यावर संघाने कायम विश्वास दाखवला आणि मला वेळ दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. एकदा सुरुवात मिळाल्यावर मी फलंदाजीची मजा लुटायला लागलो. एकच ठरवलं होतं की, चेंडू शेवटपर्यंत बघायचा आणि मग फटक्याची निवड करायची,’ असं यशस्वी सोमवारच्या खेळीबद्दल बोलताना म्हणाला. (IPL 2024)
यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal) टी-२० विश्वचषकातही भारतीय संघात निश्चित समजला जातोय. आघाडीच्या फळीत तो खेळणार हे ही जवळ जवळ ठरलेलं आहे. पण, आयपीएलमध्ये पहिले ७ डाव तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. चांगल्या सुरुवातीनंतर तो बाद होत होता. पण, ते मळभ मुंबई इंडियन्स विरुद्धच्या शतकानंतर दूर सरलंय.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community