India Military Spending : संरक्षणावर खर्च करण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर

२०२३ साली भारताने संरक्षणावर ८३ अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत.

289
India Military Spending : संरक्षणावर खर्च करण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर
India Military Spending : संरक्षणावर खर्च करण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर
  • ऋजुता लुकतुके

जगभरात संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांत भारताचा क्रमांक चौथा असल्याचं समोर आलं आहे. २०२३ मध्ये भारताने संरक्षण सामुग्री आणि मनुष्यबळ यांच्यावर मिळून ८३.६ अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च केला. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूटने एका पाहणीतून हा निष्कर्ष काढला आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. तर चीन आणि रशिया दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. २०१४ च्या तुलनेत भारताचा संरक्षण खर्च (India Military Spending) ४४ टक्क्यांनी वाढला आहे. तर २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये भारतीय संरक्षण खर्चात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

पण, विशेष म्हणजे संरक्षण खर्चातील ८० टक्के रक्कम ही मनुष्यबळ आणि व्यावहारिक खर्च यासाठी उपयोगी पडत आहे. प्रत्यक्ष साधन सामुग्रीवरील खर्च हा २० टक्केच आहे. ‘भारताच्या पाकिस्तान आणि चीन अशा दोन सीमांवरील अनिश्चित परिस्थितीमुळे भारताला युद्धासाठी तयार रहावं लागत आहे. आणि त्यामुळे व्यावहारिक खर्चात वाढ होत आहे. अर्थसंकल्पात संरक्षण विषयक तरतुदीसाठी २२ टक्के इतकी रक्कम बाजूला काढली जात आहे,’ असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Sadabhau Khot: देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरुन उरला!)

भारताने सामुग्रीवर केलेल्या खर्चापैकी ७५ टक्के खर्च हा देशांतर्गत संरक्षण उत्पादनांवर झाला आहे. आधीच्या वर्षी हे प्रमाण ६८ टक्के इतकं होतं. म्हणजेच संरक्षणाच्या बाबतीत मेक इन इंडियाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं निरीक्षण या अहवालात मांडण्यात आलं आहे. आपला शेजारी देश चीनने २०२३ मध्ये तब्बल २९६ अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च संरक्षणावर केला आहे. (India Military Spending)

तर रशिया – युक्रेन युद्ध, इस्त्रायल – हमास संघर्ष यामुळे एकूणच पाचही भूक्षेत्रांमध्ये युद्धासाठीचा खर्च वाढीला लागल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.