Novak Djokovic : नोवाक जोकोविच २०२४ चा सर्वोत्तम जागतिक क्रीडापटू

Novak Djokovic : जोकोविचला विक्रमी पाचवेळा लॉरेस जागतिक सर्वोत्तम क्रीडापटू होण्याचा सन्मान मिळाला आहे. 

163
Wimbledon 2024 : जोकोविचचा उपांत्यपूर्व फेरीत दणक्यात प्रवेश, झ्वेरेवला पराभवाचा धक्का
  • ऋजुता लुकतुके

क्रीडा जगतातील प्रतिष्ठेचे समजले जाणारे लॉरेस क्रीडा पुरस्कार मंगळवारी स्पेनच्या माद्रिद शहरात एका रंगतदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. योगायोगाने स्पेनच्याच महिला राष्ट्रीय फुटबॉल संघाला २०२४ मधील सर्वोत्तम संघाचा बहुमान मिळाला. या संघाने २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेला महिला फुटबॉल विश्वचषक जिंकला होता. तर याच संघातील मिडफिल्डर ऐताना बोनमाटी सर्वोत्तम महिला खेळाडू ठरली. बोनमाटीने फिफा विश्वचषकाबरोबरच तिचा क्लब बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. (Novak Djokovic)

तर पुरुषांमध्ये सर्वोत्तम क्रीडापटू होण्याचा मान हा सर्बियाच्या नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) मिळाला. २०२२ मध्ये जोकोविचने ३ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे लॉरेस सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार पटकावण्याची ही जोकोविचची पाचवी खेप आहे. याबाबतीत त्याने रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Novak Djokovic)

(हेही वाचा – India Military Spending : संरक्षणावर खर्च करण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर)

जोकोविचने (Novak Djokovic) २०२२ मध्ये ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या बाबतीतही रॉजर फेडररशी बरोबरी केली होती. आता त्याच्या नावावर सर्वाधिक २५ ग्रँडस्लॅम विजेतेपदं जमा आहेत. अमेरिकन महिला जिमनॅस्ट सिमॉन बाईल्स लक्षवेधी पुनरागमन करणारी क्रीडापटू ठरली. बाईल्सने २०२२ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अविस्मरणीय कामगिरी करताना तब्बल ४ सुवर्ण जिंकली. तिची जिद्द आणि कणखरपणा यासाठी सिमॉन बाईल्स ओळखली जाते. (Novak Djokovic)

लॉरेस क्रीडा पुरस्कार सोहळ्यात क्रीडापटूंच्या मैदानाबाहेरील कामगिरीचाही गौरव करण्यात आला. तसंच व्यक्तिगत आणि सांघिक प्रयत्नांबरोबर संस्थांनी केलेल्या कामाचंही कौतुक करण्यात आलं. रियाल माद्रिदच्या ज्यूड बेलिंगम यांना ब्रेकथ्रू पुरस्कार देण्यात आला. तर राफेल नदाल फाऊंडेशनने भारत व स्पेनमधील दिव्यांग मुलांसाठी केलेल्या कामाचाही गौरव करण्यात आला. (Novak Djokovic)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.