मुंबईतील कोरेानाबाधित रुग्णांचा आकडा १४००च्या वर सध्या स्थिरावलेला आहे. गुरुवारी मुंबईत जिथे १ हजार ४२५ रुग्ण आढळून आले होते, तिथे शुक्रवारी १ हजार ४१६ रुग्ण आढळले आहेत. तर शुक्रवारी दिवसभरात ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे रुग्णसंख्या
गुरुवारी दिवसभरात २९ हजार ३९१ जणांची कोविड चाचणी करण्यात आल्या होत्या, तेव्हा १ हजार ४२५ रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी दिवसभरात ३३ हजार ७८ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, दिवसभरात १ हजार ४१६ रुग्ण आढळून आले. शुक्रवारी दिवसभरात १ हजार ७६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. शु्क्रवारपर्यंत संपूर्ण मुंबईत २९ हजार १०३ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू होते. गुरुवारी जिथे ५९ रुग्ण मृत्यू पावले होते, तिथे शुक्रवारी ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू पावलेल्या रूग्णांमध्ये ३० रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे असून, यामध्ये ३३ पुरुष आणि २१ महिला रुग्णांचा समावेश आहे. चाळीशीच्या आतील ६ रुग्णांचा समावेश आहे, तर ६० वर्षांवरील ३० रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १८ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
२१ मे, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – १४१६
२४ तासात बरे झालेले रुग्ण – १७६६
बरे झालेले एकूण रुग्ण – ६४९३८९
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९३ %एकूण सक्रिय रुग्ण- २९१०३
दुप्पटीचा दर- ३१७ दिवस
कोविड वाढीचा दर ( १४ मे ते २० मे)- ०.२२ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 21, 2021
(हेही वाचाः म्युकरमायकोसीस वरील उपचारासाठी डॉक्टरांची तारेवरची कसरत)
मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर हा ९३ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ३१७ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत २७३ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ६९ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community