दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाच्या (South Mumbai Lok Sabha) जागेचा तिढा अधिकच वाढत चालला असून या जागेवर भाजपाने दावा ठोकलेला असतानाच शिवसेनेने आपली दावेदारी जवळपास निश्चित करून टाकली आहे. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट सांगितल्यानंतर भाजपाची कोंडी झाली आहे. ही जागा शिवसेनेला सोडावी लागणार असल्याने भाजपाच्या (BJP) गोटात खळबळ माजू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी इच्छुक उमेदवार असलेल्या ऍड. राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांची बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेतली की या दोन्ही संभाव्य उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. (South Mumbai Lok Sabha)
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाच्या (South Mumbai Lok Sabha) जागेचे वाटप अद्यापही लटकलेला असून सुरुवातीपासून भाजपाने (BJP) यावर दावा ठोकलेला असतानाच आता हा मतदार संघ शिवसेनेकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार असून शिवसेनेकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष तसेच पक्षाचे उपनेते यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांचा भावी खासदार म्हणून प्रचार सुरु आहे. मात्र, हा मतदार संघ भाजपाऐवजी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढला जावा आणि त्याचा किती परिणाम शिवडी, वरळी, भायखळा, मुंबादेवी आदी भागांमध्ये होईल याची समीकरणेच पटवून दिली. त्यामुळे दक्षिण मुंबईतून शिवसेनेचाच उमेदवार उभा राहिल यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. (South Mumbai Lok Sabha)
(हेही वाचा – Amit Shah : सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर अमित शाहांची टीका)
दक्षिण मुंबईचा मतदार संघ भाजपाच्या ताब्यात जाऊ लागल्याने इच्छुक उमेदवार आमदार ऍड. राहुल नार्वेकर व मंगलप्रभात लोढा यांची बैठक घेतली. या बैठकीत शेलारांनी दोन्ही आमदारांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तसेच विभागाचा आढावाही घेतल्याची माहिती घेतली. यामध्ये हा मतदार संघ भाजपालाच (BJP) मिळावा अशाप्रकारची मागणी दोन्ही नेत्यांनी लावून धरली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा मतदार संघ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला सोडल्यास चिन्ह आणि उमेदवार हे महत्वाचे नसून आपला उमेदवार एकच ते म्हणजे नरेंद्र मोदी. त्यामुळे जर हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्याचा अंतिम निर्णय झाल्यास आणि आपल्याला धनुष्यबाणाचा प्रचार करावा लागेल, असे सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शेलारांनी या दोन्ही नेत्यांकडून याबाबतचा आढावा, त्यांचे म्हणणे ऐकले की त्यांची समजूत काढून निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असला तरी जोमाने काम करावे लागेल अशाप्रकारच्या सूचना केल्या अशा प्रश्न उपस्थित होत आहे. (South Mumbai Lok Sabha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community