Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

336

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणा-या मतदानात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. अमरावतीत नवनीत राणा, अकोल्यात प्रकाश आंबेडकर, परभणीत महादेव जानकर, नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर, बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) भाजपाचे उमेदवार नवनीत राणा आणि कॉँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात थेट लढत होते. या मतदारसंघात बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत तिरंगी लढत होते. विद्यमान भाजपा खासदार, माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे, कॉंग्रेस पक्षाचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत.

(हेही वाचा इंडी आघाडीचा फॉर्म्युला ‘वन इयर वन पीएम’; PM Narendra Modi यांचे टीकास्त्र)

परभणीमध्ये मविआचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळींऐवजी राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आले. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे संजय देशमुख उभे आहेत.

  • वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांच्यात लढत होते.
  • नांदेडमध्ये विद्यमान भाजपा खासदार प्रतापराव चिखलीकर आणि आणि कॉँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांच्यात थेट लढत आहे. इथे भाजपासोबतच अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली.
  • बुलढाणा लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, विद्यमान खासदार प्रताप जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यात थेट लढत होते.
  • हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात लढत आहे.
  • या आठही लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावला. आता मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात कौल टाकतात, यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.