RBI on Kotak Mahindra Bank : रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर नेमके कुठले निर्बंध लादलेत?

RBI on Kotak Mahindra Bank : रिझर्व्ह बँकेनं २४ एप्रिलपासून कोटक महिंद्रा बँकेवर नवीन क्रेडिट कार्ड देणं आणि डिजिटल माध्यमातून नवीन ग्राहक नोंदणी करण्यावर बंदी घातली आहे 

209
Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवरील निर्बंधांचा ग्राहकांवर काय परिणाम होणार?
  • ऋजुता लुकतुके

रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर (RBI on Kotak Mahindra Bank ) मोठा बडगा उगारताना काही महत्त्वाचे निर्बंध घातले आहेत. कोटक महिंद्रा बँकेला आता ऑनलाईन तसंच मोबाईल पद्धतीने नवीन ग्राहक नोंदणी करून घेता येणार नाही. तसंच नवीन क्रेडिट कार्डही देता येणार नाहीत. २४ एप्रिलपासूनच हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेच्या माहिती तंत्रज्जान प्रणालीवर दोन वर्ष लक्ष ठेवल्यानंतर आणि या यंत्रणेत दिसलेल्या त्रुटी बँकेनं वेळेवर न सुधारल्यामुळे ही कारवाई केल्याचं रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) म्हटलं आहे. (RBI on Kotak Mahindra Bank )

(हेही वाचा- Happy Birthday Sachin : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नजाकतभऱ्या फटक्यांचा व्हीडिओ व्हायरल)

बँकेच्या सध्याच्या ग्राहकांना या निर्णयाचा कुठलाही फटका बसणार नाही. क्रेडिट कार्ड ग्राहकांनाही सेवा मिळत राहतील, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. पण, बँकेच्या नवीन ग्राहक जोडण्याच्या प्रक्रियेला यातून मोठा फटका बसणार आहे. कारण, आधुनिक जगात बहुतेक ग्राहक हे डिजिटल किंवा ऑनलाईन पद्धतीनेच बँकेशी जोडले जातात. प्रत्यक्ष बँकेत चौकशी करून फार कमी ग्राहक येतात. पण, हा ऑनलाईन मार्गच आता बँकेसाठी सध्या बंद आहे म्हटल्यावर बँकिंग सेवेचा विस्तार थांबणार आहे. शिवाय क्रेडिट कार्ड व्यवसायाला तर चांगलीच खिळ बसेल. (RBI on Kotak Mahindra Bank )

नवीन ग्राहक डोजता येणार नसल्यामुळे क्रेडिट कार्डासाठी बँकेनं केलेले को – ब्रँडिंगचे (Co – Branding) व्यवहार आता अडचणीत येऊ शकतील. २०२२ आणि २०२३ मध्ये बँकेच्या ऑनलाईन यंत्रणेची नीट पाहणी केल्यानंतर आणि वेळोवेळी बँकेला इशारा देऊनही उपाययोजना न झाल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं मध्यवर्ती बँकेनं म्हटलं आहे. बँकेची ऑनलाईन यंत्रणा उभारताना रिझर्व्ह बँकेच्या काही नियमांचं पालन न केल्याचा ठपका मध्यवर्ती बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर ठेवला आहे. ग्राहकांच्या डेटाची सुरक्षितता, ग्राहकांच्या माहितीची उपलब्धता असा महत्त्वाच्या गोष्टींमध्ये रिझर्व्ह बँकेला त्रुटी आढळल्या आहेत.  (RBI on Kotak Mahindra Bank )

(हेही वाचा- Mark Zuckerberg: AIवर कोट्यवधी रुपये मेटा खर्च करणार; मार्क झुकेरबर्ग यांची घोषणा)

रिझर्व्ह बँकेनं कान पिळल्यावर कोटक महिंद्रा बँकेनं लागलीच सध्याच्या ग्राहकांसाठी एक पत्रक जारी केलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन करू. लवकरात लवकर ही यंत्रणा पुन्हा उभारू, असं बँकेनं म्हटलं आहे. तर इतर बँकिंग सेवा नियमित आणि सुरळीत सुरू राहतील याचीही हमी बँकेनं दिली आहे. (RBI on Kotak Mahindra Bank )

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.