Israel-Hamas Conflict: अमेरिकेत विद्यार्थ्यांनी निदर्शनं केल्यामुळे बायडन सरकार चिंतेत, विद्यापीठांमध्ये सामूहिक अटक सत्र सुरू

अमेरिकेत आता आंदोलकांवर कडक कारवाई सुरू असून अनेकांना अटक करण्यात आली आहे.

184
Israel-Hamas Conflict: अमेरिकेत विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुरू केल्यामुळे बायडन सरकार चिंतेत, विद्यापीठांमध्ये सामूहिक अटक सत्र

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध ७ ऑक्टोबरला सुरू झाले. त्यानंतर आजतागायत हे घनघोर युद्ध काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही. आता या युद्धात इराणचाही समावेश झाला आहे. त्यामुळे युद्धाचा भडका दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर बनत चालला आहे. इस्रायलच्या बाजून उभं राहणाऱ्या अमेरिकेनेही आता आपली भूमिका कडक केली असून इस्रायला इशारा दिला आहे. (Israel-Hamas Conflict)

या युद्धाचे पडसाद अमेरिकेत उमटत असून ऐन निवडणुकांच्या तोंडावर अमेरिकेत विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुरू केल्यामुळे बायडन सरकार चिंतेत आहे. तर राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीदेखील इस्रायलने शस्रसंधी करण्याबद्दल विधान केलं आहे. यावरून अमेरिकेतील बदलणारं चित्रं पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा – Balbharti Syllabus: इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके पुढच्या वर्षी बदलणार, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक)

आंदोलकांवर कडक कारवाई
अमेरिकेत आता आंदोलकांवर कडक कारवाई सुरू असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी इस्रायलच्या गाझाबरोबरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेतील अनेक विद्यापीठांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. आतापर्यंत कोलंबिया विद्यापीठात अशा प्रकारची आंदोलनं होत होती, मात्र आता आयव्ही लीग स्कूल हार्वर्ड आणि येलसह किमान पाच विद्यापीठांमध्ये हे लोण पसरलं आहे.

पॅलेस्टिनी विद्यार्थी संयोजकास अटक
टेक्सास विद्यापीठाच्या ऑस्टिन कॅम्पसमध्ये १०० सैनिकांची तुकडी घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुमारे २० विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात अशीच दृश्यं पाहायला मिळाली. पोलिसांनी पॅलेस्टिनी विद्यार्थी संयोजकास अटक केली. इथल्या व्हिडिओंमध्ये पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाठीचार्ज करताना पाहायला मिळत आहे. हार्वर्डमध्ये, पॅलेस्टिनी समर्थक आंदोलकांनी कॅम्पसवर हल्ला केला. काही दिवसांनी विद्यापीठानं यार्डमध्ये प्रवेश रोखला असून फक्त हार्वर्ड आयडीधारकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.