Lok Sabha Election 2024 : ‘ओवेसींसारख्या नेत्याची तोंडं बंद व्हायला हवी’, माधवी लता कडाडल्या

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. ते म्हणाले की, ओवेसीसारखे नेते देशात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत.

194
Lok Sabha Election 2024 : 'ओवेसींसारख्या नेत्याची तोंडं बंद व्हायला हवी', माधवी लता कडाडल्या

हैदराबादमधील भाजपा उमेदवार माधवी लता (Madhavi Lata) यांनी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अकबरुद्दीन (Akbaruddin) आणि असुदुद्दीन ओवेसी यांसारख्या नेत्यांची तोंडे बंद केली पाहिजेत, कारण ते सामान्य माणसात विष पेरण्याचे काम करत आहेत, असे विधान हैदराबाद लोकसभा उमेदवार माधवी लता (Hyderabad Lok Sabha Candidate Madhvi Lata) यांनी म्हटले आहे.  (Lok Sabha Election 2024)

माधवी लता हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. असुद्दीन ओवेसी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून भाजप उमेदवाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) टोला लगावला. माधवी लता म्हणाल्या, ‘पंतप्रधानांच्या कोणत्या योजनेवर हिंदू मुस्लिम लिहिले आहे? अकबरुद्दीन, असदुद्दीन ओवेसी यांसारख्या नेत्यांची तोंडे बंद केली पाहिजेत. ते समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत.  (Lok Sabha Election 2024)  

‘दंगलीला मोदी जबाबदार असतील’

खरे तर असुद्दीन ओवेसी बिहारच्या किसनगंजमध्ये म्हणाले होते, ‘पंतप्रधान मोदींची एकमेव हमी मुस्लिमांविरुद्ध द्वेषाची हमी आहे. २००२ पासून ते मुस्लिमांचा द्वेष करत आहेत. देशात १७ कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे, ते सर्वांचे पंतप्रधान आहेत, उद्या दंगल झाली तर त्याला मोदी जबाबदार असतील. इथेच न थांबता ओवेसी म्हणाले, ‘कुठे आहे सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास, द्वेष निवडणुका संपल्यानंतर वाढेल. पंतप्रधान मोदी हिटलरची भाषा बोलत आहे. असे आरोप ओवेसी यांनी लगावले.  (Lok Sabha Election 2024)

माधवी लताचे उत्तर

ओवेसींच्या या वक्तव्यावर माधवी लतादीदी म्हणाल्या, ‘आम्ही जेवढ्या योजना आणल्या आहेत. त्या योजनांमध्ये हिंदू-मुस्लिम लिहिले आहे का ? असे विधान लोकांमध्ये विष पेरण्याचे काम करते. जेव्हा कॉँग्रेस म्हणते, लोकांच्या मालमत्तेची मुस्लिमांमध्ये वाटणी करणार असे काँग्रेस म्हणते तेव्हा ओवेसी कुठे असतात ? असुदुद्दीन ओवेसी २००४ पासून सतत हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत. यावेळी भाजपाच्या माधवी लता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही लढत रंजक बनली आहे. (Lok Sabha Election 2024)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.