घराबाहेर खेळताना अचानक बेपत्ता (missing) झालेल्या बहीण भावांचे एका बंद मोटारीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुस्कान आणि साजिद असे या दोन्ही भावंडाचे नावे असून मुस्कान (Muskan Sheikh) ही ५ वर्षे आणि साजिद (Sajid Sheikh) हा ७ वर्षाचा आहे. ही घटना बुधवारी रात्री अँटॉप हिल येथील सीजीएस वसाहत या ठिकाणी घडली आहे.महिन्याभरापूर्वी माटुंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत महर्षी कर्वे उद्यानात दोन भावांचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.अँटॉप हिल येथील घटनेतील प्राथमिक तपासात या दोघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यू नोंद केली आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : ‘ही’ माझी शेवटची निवडणूक, नारायण राणे राजकीय निवृत्तीची घोषणा करत म्हणाले…)
मुस्कान शेख (Muskan Sheikh) (५) आणि साजिद शेख (Sajid Sheikh) (७) असे या दुर्देवी मुलांचे नाव आहे. अँटॉप हिल सीजीएस वसाहत या ठिकाणी असलेल्या एका झोपड्यात राहणारे मोहब्बत शेख आणि सायरा शेख यांचे ही मुले होती. शेख हा मोलमजुरीचे काम करतो, बुधवारी दुपारी आई घरात झोपलेली असतांना २ वाजता दोन्ही मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. ५ वाजता आई झोपेतून उठली असता दोन्ही मुले घरात दिसून न आल्यामुळे तीने परिसरात मुलांचा शोध घेतला. परंतु मुले मिळून येत नसल्यामुळे अखेर रात्री ८ वाजता अँटॉप हिल पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. (Mumbai Crime )
अँटॉप हिल पोलिस ठाण्याचे एक पथक तात्काळ मुलांचा शोध घेण्यासाठी सीजीएस वसाहत गाठले, दोन्ही मुलांचा शोध घेत असताना मुलांच्या घरापासून काही अंतरावर अनेक जुन्या भंगार झालेल्या मोटारी होत्या, पोलिसांनी टॉर्चच्या मदतीने या मोटारीमध्ये मुलांचा शोध घेतला असता लाल रंगाचा एका मोटारीच्या पुढच्या सीटवर मुस्कान आणि साजिद हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तात्काळ मोटारीचे दार उघडून दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन सायन रुग्णालय गाठले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात श्वास गुदमरून दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन शवविच्छेदन विभागाकडे पाठविण्यात आलेली असून शवविच्छेदन अहवालानंतर मुलांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करून अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. (Mumbai Crime )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community