- ऋजुता लुकतुके
यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण १२ वेळा दोनशे पेक्षा जास्त धावा एखाद्या संघाने केल्या आहेत आणि हे प्रमाण सामन्यांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. इम्पॅक्ट खेळाडूमुळे हे शक्य होतं, असं मत गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) व्यक्त केलं आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यानंतर तो बोलत होता. ‘इम्पॅक्ट खेळाडूमुळे फलंदाजाला अधिक आक्रमकपणे खेळता येतं. फलंदाजी करताना तुमचा बळी गेला तरी नवीन फलंदाज येऊन आक्रमक खेळू शकणार असतो. या विश्वासामुळेच फलंदाज दोनशेच्या वर धावा करत आहेत,’ असं शुभमन गिल म्हणाला. (Shubman Gill on Impact Player)
शुभमन म्हणतो त्यात तथ्य आहे. कारण, यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त दोनशेच्या वर धावा नाही झालेल्या. तर प्रतिस्पर्धी संघानेही दोनशेची मजल मारली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यातही दिल्ली कॅपिटल्सने आधी ५ बाद २२५ धावा केल्या. त्याला उत्तर देताना गुजरात टायटन्सनेही ८ बाद २२० इतक्या धावा जमवल्या. या हंगामात आयपीएलमधील (IPL) सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम सनरायझर्स हैद्राबादने दोनदा मोडला. पण, त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे मुंबई आणि बंगळुरूनेही दोनशेचा टप्पा गाठला. त्यामुळे दोन सामन्यांमध्ये तर दोन्ही डाव मिळून साडेपाचशेच्या वर धावा झाल्या आहेत. (Shubman Gill on Impact Player)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : आचारसंहितेचा भंग; पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींनाही नोटिस )
त्याबद्दल बोलताना गिल (Shubman Gill) म्हणतो, ‘दिल्लीला आम्ही दोनशेच्या आत रोखू शकू असं वाटलं होतं. पण, शेवटच्या दोन षटकांत जास्त धावा दिल्या गेल्या. पण, धावांचा पाठलाग करताना तुम्हाला किती धावा करायच्या आहेत याचं भान तुम्हाला असतं. त्यामुळे २२५ धावा करताना आम्हाला धावांचं नियोजन आणि इम्पॅक्ट खेळाडू नियमाचा फायदा घेणं शक्य होतं.’ शुभमन गिल इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमाच्या बाजूने बोलला असला तरी या नियमावर माजी खेळाडू आणि भारतीय कर्णधार रोहीत शर्माने टीका केली आहे. अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व कमी होत असल्याची टीका या नियमावर झाली आहे. (Shubman Gill on Impact Player)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community