Salman Khan Attack Case : पंजाबमधून दोघे ताब्यात, अटक आरोपीच्या पोलीस कोठडीत २९ एप्रिलपर्यंत वाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू चंदर आणि अनुज या दोघांनी हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल यांना या हल्ल्यासाठी शस्त्रे पुरवली होती.

191
Salman Khan Firing Case : अनुजच्या मृत्यूचा तपास CBI कडे देण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार

सलमान खान हल्ला प्रकरणात (Salman Khan Attack Case) पंजाब राज्यातून आणखी दोघांना मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे. या दोघांनी हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना हल्ल्यासाठी शस्त्रे पुरवली होती अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी दिली. दरम्यान गुन्हे शाखेच्या अटकेत असणारे सागर पाल आणि विकी गुप्ता यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने या दोघांच्या पोलीस कोठडीत २९ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. (Salman Khan Attack Case)

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील ‘गॅलेक्सी आपर्टमेंट’ या निवासस्थानावर १४ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने पंजाब राज्यातील जालिंदर येथून गुरुवारी सकाळी सोनू चंदर (३७) आणि अनुज थापन (३२) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना मुंबईत आणून अटक करण्यात येणार असून उद्या, शुक्रवारी (२६ एप्रिल) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू चंदर आणि अनुज या दोघांनी हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल यांना या हल्ल्यासाठी शस्त्रे पुरवली होती. अनुज आणि सोनू हे हल्ल्याच्या आठवड्यापूर्वी पनवेल येथे आले होते व त्यांनी सोबत आणलेले दोन पिस्तुल चार मॅगझीन आणि ३८ काडतुसे हल्लेखोरांना दिली होती. अनुज हा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असून त्याच्यावर ३ गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी दिली आहे. (Salman Khan Attack Case)

(हेही वाचा – Pravin Darekar : उद्धव ठाकरेंना ना महाराष्ट्राचे प्रश्न माहित, ना त्यांनी आंदोलने केली; प्रविण दरेकरांचा घणाघात)

दरम्यान गुन्हे शाखेने १६ एप्रिल रोजी गुजरातच्या भुज येथून अटक करण्यात आलेले हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी हल्ल्यात वापरलेले पिस्तुल, काडतुसे आणि मॅगझीन हे सुरत येथील तापी नदीच्या पात्रात फेकून दिले होते. गुन्हे शाखेने त्यापैकी दोन पिस्तुल ४ मॅगझीन आणि १७ काडतुसे नदीच्या पात्रातून हस्तगत करून जप्त केली आहे. गुन्हे शाखेच्या अटकेत असलेले विकी आणि सागर यांची गुरुवारी पोलीस कोठडी संपली असता त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते, गुन्हे शाखेने या दोघांची ४ दिवसांची कोठडीची मागणी केली होती, दरम्यान आरोपीचे वकील अजय उमापती दुबे यांनी विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून गुन्हे शाखेला या दोघांची पोलीस कोठडी २९ एप्रिलपर्यंत वाढवून दिली. (Salman Khan Attack Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.