Lok Sabha Election 2024 : उबाठाच्या जाहीरनाम्यात कोणकोणत्या घटकासाठी कोणती आहेत आश्वासने?

218
Shiv Sena UBT : शिवाजी महाराज, बाळासाहेब, हिंदुत्व, सावरकर, मराठी माणूस ‘वचननाम्या’तून गायब

महाराष्ट्र लुटण्याचा एककलमी कार्यक्रम सरकार करत आहे. त्याला केंद्राचा आशिर्वाद आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जात आहेत. महाराष्ट्रात येणारे उद्योगंदे पळवले जात आहेत. हिरे व्यापार, हिरे बाजार पळवला, क्रिकेटची मॅच पळवली, फिल्म फेअर कार्यक्रम पळवला. महाराष्ट्राचे वैभव लुटले जात आहे, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र लूट आम्ही थांबवू आणि महाराष्ट्राचे वैभव परत मिळवून देऊ असे आश्वासान उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर उबाठा गटाचा जाहीरनामा गुरुवार, 25 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला.

काय आहे जाहीरनाम्यात? 

  • देशात आणि महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यानंतर जो काही खड्डा मोदी सरकारने महाराष्ट्रात पाडला आहे, तो भरून काढू आणि महाराष्ट्राचे वैभव पुन्हा एकदा प्राप्त करुन देऊ असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले. आम्ही गुजरातचे काही ओरबाडून घेणार नाही. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक राज्याचा मान ठेऊ, सर्व राज्यांचा आदर ठेऊ, पण वित्तीय केंद्र नव्याने महाराष्ट्रात उभारू, ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
  • आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर उणिवा आहेत, जिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करुन रुग्णालये अद्ययावत केली जातील. काही ग्रामीण रुग्णालयात आरोग्य यंत्रणा अद्ययावत केली जातील.

(हेही वाचा America : मणिपूरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन; अमेरिकेतील अहवालानंतर भारताने सुनावले)

  • इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल, महाराष्ट्रात आम्ही केवळ कर्जमुक्त करुन थांबणार नाही तर शेतकऱ्यांना जो पीकविमा मिळतो, त्या पीकविम्याचे निकष बदलेले जातील, शेतकऱ्यांना नुकसाानभ भरपाई मिळाली पाहिजे.
  • शेतकऱ्यांची खतं, बी-बियाणं, शेतीची अवजारे जीएसटी मुक्त करु, जेणेकरुन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाईल.  कृषीखात्यामध्ये सर्वे करणारे केंद्र स्थापन करणार असल्याचेही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वचननाम्यात नमुद करण्यात आले आहे.
  • महिलांना संकटसमयी व अन्यायप्रसंगी तात्काळ मदत मिळावी म्हणून शासनाच्या मदतीने ‘एआय चैट- बोट यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना शासकीय मदत उपलब्ध करून देणार शासकीय यंत्रणा तसेच योजनेत महिलांचा योग्य सन्मान राखला जाईल व त्यांना पुरुषांएवढ्याच सुविधा व संधी उपलब्ध करून देणार.
  • इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसने महिलांसाठी ‘महालक्ष्मी’ योजना जाहीर केली असून या योजनेप्रमाणे प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी १ लाख रूपये देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. इंडिया आघाडी सरकारकडून या योजनेची त्वरीत व प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सदैव सतर्क राहतील. महिलांबद्दल जाहीरपणे अपशब्द वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
  • महाराष्ट्रातील युवक-युवतींना जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्र राज्यातच मिळवून देणार. महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठातील शिक्षण आधुनिक युगातील मागणीनुसार बदलणार संशोधन, कौशल्य, विकास यांना प्राधान्य दिले जाणार. युवक-युवतींचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार.
  • दर्जेदार प्रशिक्षित डॉक्टर निर्माण व्हावेत यासाठी केंद्र आराखडा तयार करणार. सरकारच्या मदतीने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी उद्योगजगता विकास, संगणकीय भाषा (CODING), खगोल शास्त्रज्ञ, आर्थिक साक्षरता यासारख्या क्षेत्रात युवक सुशिक्षित व्हावेत यासाठी शिक्षण क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार, केंद्र शासनामार्फत यासाठी विशेष आर्थिक सहाय्यता देणारी योजना आणणार.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.