महाविकास आघाडीतील शिवसेनेला ४ जागा मिळाल्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोनच जागा आल्या. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत प्रदेश काँग्रेसवर याचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही नाराजी उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर उमेदवारी मिळवण्यासाठीच खटाटोप असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गायकवाड यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात संजय निरुपम यांना उमेदवारी मिळवण्यासाठी भांडता आले नाही, मात्र पक्षावर नाराजी व्यक्त करत उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे तिकीट आपल्या पदरात पाडून घेण्यात गायकवाड यशस्वी ठरल्या आहेत. (Varsha Gaikwad)
गायकवाड यांच्या नावाची घोषणा
उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरु शकलेला नाही. मात्र, या लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्यांनतर या ठिकाणच्या उमेदवाराची घोषणा काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणू गोपाळ यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व आमदार वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली. (Varsha Gaikwad)
(हेही वाचा – Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड यांच्या नाराजीमागे हे आहे प्रमुख कारण…)
नाराजी नाट्य रचत पक्षावर आणला दबाव
मुंबईतील सहा जागांपैंकी उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोनच मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आमदार अस्लम शेख, अमिन पटेल यांच्यासह दिल्ली जात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणू गोपाळ यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबईतील जागा वाटपासंदर्भात नाराजी व्यक्त केली. मात्र, ही नाराजी काँग्रेस पक्षाला अधिक जागा मिळाव्यात यासाठी नसून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना स्वत: दक्षिण मध्य मुंबईत तिकीट न मिळाल्याने किमान उत्तर मध्य मुंबईतील जागेवर तिकीट मिळावे यासाठीच प्रयत्न होता. वर्षा गायकवाड या स्वत:साठी नाराजी नाट्य रचत पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असून उत्तर मध्य मुंबईचे तिकीट मिळवण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. (Varsha Gaikwad)
दक्षिण मध्य मुंबईत उमेदवारी न मिळाल्याने…
दक्षिण मध्य मुंबईत उमेदवारी न मिळाल्याने याच्या नावावरून नाराजी व्यक्त करून उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न होता. स्वत:ला उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मिळवून धारावी विधानसभेच्या मतदार संघात आपल्या भावाला उमेदवारी मिळवून देण्याचा मार्ग खुला करण्याचा त्यांचा विचार आहे. (Varsha Gaikwad)
महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरेना
या लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान भाजपाच्या खासदार पुनम महाजन आहेत. सन २०१४ आणि सन २०१९मध्ये सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र, पुनम महाजन यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही स्पष्टता नसून याठिकाणी महाजन यांचा पत्ता कापला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आशिष शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. (Varsha Gaikwad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community