Sharad Pawar : पक्षातून निघून गेलेले आमदार पुन्हा येतील का? यावर शरद पवार म्हणाले….

253
Sharad Pawar राज्यातील मिनी औरंगजेब; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
Sharad Pawar राज्यातील मिनी औरंगजेब; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

पक्षातून निघून गेलेले आमदार पुन्हा येतीलच अशी शक्यता सध्या तरी वाटत नाही. येतील तेव्हा पाहू. परंतु एक निश्चित आहे, जोपर्यंत मोदी सत्तेत आहे, तोपर्यंत हे सहकारी परत येण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी (शप)चे प्रमुख शरद पवार  यांनी मांडले. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते.

वर्चस्वातून पक्ष फुटला नाही तर एजन्सींच्या चौकशींचे जे उद्योग सुरु होते. त्यामुळे अनेक सहकारी अस्वस्थ झाल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे पवारांनी स्पष्ट केले. काही नेत्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत अवघड झाली होती. एका सहकाऱ्याच्या कुटुंबांतील सदस्याने तर आम्हाला गोळी मारा, अशी प्रतिक्रिया एजन्सीला दिली होती, यावरून किती दबावाचे राजकरण होते हे लक्षात येते, हेच पक्ष फुटीची कारण आहे, ते शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंच्या इंजिनामध्ये फक्त आदित्य ठाकरेंनाच जागा; संजय राऊतांना नाही; Devendra Fadanvis यांचे टीकास्त्र)

आजचे मरण उद्यावर गेले 

मला अंदाज आहे की, जी फाईल टेबलवर जाईल ती मोदींच्या विचारांसोबत गेल्यानंतर ती फाईल कपाटात ठेवली जाईल. उद्या त्यांना वाटेल तेव्हा ती फाईल कधीही काढली जाईल. त्यामुळे आजचे मरण उद्यावर गेले, असे वाटले तर त्यात काही चुकीचे  नाही. त्यांच्या डोक्यावर कारवाईची तलवार नेहमी राहील, असा मोठा दावा शरद पवारांनी केला. लोकशाहीत कुणालाही निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला. अजित पवार गेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत उभे होते तेव्हा ते भाजपकडून उभे नव्हते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे होते. भाजप नेते चंद्रकांत पाटील बोलले की, आम्हाला बारामतीत शरद पवारांचा पराभव करायचा आहे. त्यांची ती इच्छा आहे. त्यांनी तसा निर्णय घेतलेला दिसतोय. आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ही आहे की, मी स्वत: उमेदवार नाही, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.