गूगल वॉलेट (Google wallet) अद्यापही भारतामध्ये लाँच झाले नाही, मात्र देशातील काही वापरकर्ते हे ॲप गूगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. गूगल वॉलेट ॲप वापरकर्त्यांना डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यास मदत करते. तसेच हे एक डिजिटल वॉलेट म्हणून देखील काम करते. ज्यामध्ये वापरकर्ते गिफ्ट कार्ड्स, जिम सदस्यत्त्व, इव्हेंट्सचे तिकीट, विमानाची तिकिटे अशा अनेक गोष्टी सेव्ह करून ठेवू शकतात.
गूगल वॉलेट (Google wallet) हे आपल्या देशातील गूगल पे या ॲपपेक्षा वेगळे आहे. UPI पेमेंटची सेवा देणाऱ्या गूगल पेपेक्षा गूगल वॉलेट हे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून संपर्करहित पेमेंट करण्यापुरते मर्यादित आहे. इतकेच नाही, तर गूगल वॉलेट केवळ नियर फिल्ड कम्युनिकेशनला [NFC] सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनवरच काम करेल. टेकक्रंचनुसार [TechCrunch] गूगल हे भारतामध्ये वेगवेगळ्या वापरकर्त्यांसाठी गूगल पे आणि गूगल वॉलेट अशा दोन्ही ॲप्सच्या सेवा देत राहील असे समजते.
(हेही वाचा Sharad Pawar : पक्षातून निघून गेलेले आमदार पुन्हा येतील का? यावर शरद पवार म्हणाले….)
पॉवर्डबाय WearOS स्मार्टवॉचदेखील हे वॉलेट ॲप डाउनलोड करू शकतात आणि त्यांच्या स्मार्ट घड्याळ्यांमधून कोणतेही संपर्कराहित पेमेंट करू शकतात. तसेच, निवडक अँड्रॉइड वापरकर्तेदेखील हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून, त्यामध्ये पासकोड जोडू शकतात. हे ॲप वापरकर्त्यांना जीमेलवरूनदेखील पासकोड जोडण्यासाठी परवानगी देते आणि पेमेंट करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी कारण्याचा पर्याय देते.
Join Our WhatsApp Community