लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील (Lok Sabha Election Phase 2) मतदानाला सुरूवात झाली आहे. परंतु महाराष्ट्रातील मतदान केंद्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अमरावती शहराच्या काही भागात रिमझिम अवकाळी पाऊस सुरु आहे. (Lok Sabha Election Phase 2) तर अकोल्यात जिल्ह्यासह शहरात पहाटेच्या (Maharashtra Rain Update) सुमारास तुरळक पाऊस झाला. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरु झालेला पाऊस रात्रभर कायम होता. बुलढाणा, खामगाव, मोताळा, नांदुरा, शेगाव या तालुक्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरुच होता. सकाळीही पावसाने हजेरी लावली आहे. (Lok Sabha Election Phase 2)
(हेही वाचा –Lok Sabha Election Phase 2: १३ राज्यातील ८८ मतदारसंघात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू!)
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/MtM4iLJpOI— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 25, 2024
‘या’ ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा
हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर वर्धा, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती , अकोला, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Lok Sabha Election Phase 2)
(हेही वाचा –PM Narendra Modi : कॉंग्रेसला ओबीसी समाजाचे आरक्षण मुस्लिम समाजाला द्यायचे आहे; पंतप्रधानांचा आरोप)
बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने रात्रभर अनेक तालुक्यात हजेरी लावली आहे. बुलढाण्यातील खामगाव, मोताळा, नांदुरा, शेगाव या तालुक्यात रात्रभर रिमझिम पाऊस सुरूच होता. सकाळीही या पावसाने हजेरी लावली आहे. तर अकोल्यात पहाटेच्या सुमारास शहरासह जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला आहे. (Lok Sabha Election Phase 2)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community