D.Gukesh : नवीन कँडिडेट्स चषक विजेत्या गुकेशचं चेन्नईत जोरदार स्वागत 

D. Gukesh : १७ वर्षीय गुकेश कँडिडेट्स चषकातील विजयानंतर गुरुवारी भारतात परतला

182
World Chess Championship 2024 : पहिल्या सामन्यात डिंग लिरेनची गुकेशवर मात
  • ऋजुता लुकतुके

कँडिडेट्स चषक (Candidates Cup) स्पर्धा १७ व्या वर्षी जिंकून भारताचा डी गुकेश (D.Gukesh) गुरुवारी सकाळी आपल्या गावी चेन्नईला (Chennai) परतला. तिथे त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. गुकेशची शाळा वेल्लामल विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी त्याच्या स्वागताला हजर होते. त्या शिवाय इतरही चाहते विमानतळावर गर्दी करून उभे होते. आपलं हे स्वागत पाहून गुकेश आनंदला. (D.Gukesh)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: हिंगोलीत मतदानादरम्यान अनेक अडथळे, ३९ बॅलेट मशीन तर १६ कंट्रोल युनिट बदलले)

‘मी या स्वागतामुळे खूपच भारावून गेलो आहे. मला आनंदही झालाय. ही कामगिरी महत्त्वाची आहेच. पण, सुरुवातीपासून मला सूर सापडत गेल्यामुळे फारसं दडपण आलं नाही. उलट मी विजयी होईन असा आत्मविश्वास मला वाटत होता,’ असं गुकेशची मीडियाशी बोलताना पहिली प्रतिक्रिया होती. त्याचबरोबर त्याने आपले पालक, प्रशिक्षक, शिक्षक, पाठिराखे, शाळा आणि प्रायोजक यांचे आभार मानले.  (D.Gukesh)

त्याची आई पद्मा, वडील रजनीकांत (Rajinikanth) आणि त्याचे इतर कुटुंबीयंही त्याच्या स्वागताला हजर होते. वडील रजनीकांत हे नाक, कान व घसा तज्ज आहेत. पण, गुकेशच्या कारकीर्दीवर लक्ष देण्यासाठी अलीकडेच त्यांनी डॉक्टरी पेशा सोडला आहे. ते आता त्याच्याबरोबर टोरँटो इथं होते. मुलाच्या कामगिरीचा अभिमान व्यक्त करतानाच त्यांनी अजून यशाच्या आनंदातून सावरलेलो नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (D.Gukesh)

कँडिडेट्स चषक (Candidates Cup) बुद्धिबळ स्पर्धा जिंकून गुकेश विश्वनाथन आनंद (D.Gukesh) नंतरचा फक्त दुसरा भारतीय आव्हानवीर बनला आहे. म्हणजे तो आता जगज्जेत्या डिंग लिरेनला आव्हान देऊ शकतो. शिवाय सतराव्या वर्षी ही मानाची स्पर्धा जिंकून गुकेशने कॅस्परोव्हचा विक्रमही मोडीत काढला आहे. कॅस्परोव्हने २२ व्या वर्षी कँडिडट्स चषक जिंकला होता. आता गुकेश ही स्पर्धा जिंकणारा वयाने सगळ्यात लहान बुद्धिबळपटू ठरला आहे. (D.Gukesh)

(हेही वाचा- Lok Sabha Election Phase 2: आठ मतदारसंघात आतापर्यंत किती टक्के मतदान? वाचा सविस्तर)

खुद्द गॅरी कॅस्परोव्हने गुकेशचा विजय म्हणजे टोरँटोमध्ये झालेला भारतीय भूकंप असल्याचं म्हटलं आहे. या स्पर्धेतून भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली ताकद जगाला दाखवून दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. गुकेशने वयाच्या १२ व्या वर्षी ग्रँडमास्टर (Grandmaster) हा किताब पटकावला. ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात लहान भारतीय बुद्धिबळपटू ठरला होता. त्यानंतर त्याने फिडे जागतिक क्रमवारीत २,७५० एलो रेटिंग गुणांचा मापदंड सर केला. इतक्या लहान वयात ही कामगिरी करून त्याने जागतिक क्रमवारीत विश्वनाथन आनंदलाही काही काळ मागे टाकलं होतं. तो तेव्हा आठव्या स्थानावर होता. सध्या गुकेश सोळाव्या स्थानावर आहे. (D.Gukesh)

(हेही वाचा- BMC : मुंबई महापालिकेत यापुढे ना कुठला नवीन प्रकल्प ना योजना, काय आहे कारण? जाणून घ्या!)

यावर्षाच्या शेवटी त्याची आणि जगज्जेत्या डिंग लिरेनची लढत होईल असा अंदाज आहे. (D.Gukesh)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.