एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु (Solapur Lok Sabha) असताना दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील प्रचारसभांकडे जनतेचे लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे येत्या २९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या जाहीर सभा होणार आहेत. सोलापुरात (Solapur Lok Sabha) या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. एकाच दिवशी या सभा असल्यामुळे सोलापुरात कोणाची तोफ धडाडणार याकडे लक्ष असेल.
(हेही वाचा –Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या मनात हिंदूबद्दल किती द्वेष?…पहा सोशल मीडियावरील ‘हा’ व्हिडियो…)
सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha) काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) या दोन आमदारांमध्ये थेट लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार आहे. या दोन्हीही सभा एकाच दिवशी सोमवारी २९ एप्रिलला होणार आहेत. (Solapur Lok Sabha)
(हेही वाचा –Lok Sabha Election Phase 2: महाराष्ट्रातील मतदान केंद्रात अवकाळी पावसाची हजेरी, मतदानावर परिणाम होण्याची शक्यता!)
सभेची तयारी सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ही होम मैदानावर होणार आहे. सध्या या सभेचा मंच उभारण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच या सभेच्या पार्श्वभूमीवर इतरही तयारी सुरु करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची सभा ही ३० एप्रिल रोजी होणार होती. मात्र यात बदल करण्यात आला आहे. ही सभा २९ एप्रिलला संध्याकाळी कर्णिक मैदानावर होणार आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे सोलापुरात (Solapur Lok Sabha) जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी होणाऱ्या या हयव्होल्टेज सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Solapur Lok Sabha)
हेही पहा –