मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे पावडर दौरा!

शिवसेना आणि कोकण हे नात उद्धव ठाकरेंना कळले असते, तर कोकणवासीयांचा असा अपमान केला नसता. उलट उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा  एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे, असे भाजप आमदार नितेश राणे म्हणाले. 

109

तौक्ते वादळात कोकणच्या नुकसानीचा पाहणी दौरा विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केल्यावर, आपल्यालाही उत्तर द्यावे लागेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा केला, घराबाहेर पडून स्वतःच्या कपड्याची इस्त्री मोडू न देता ते परत घरी गेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांचा असा दौरा कुणी पहिला नसेल, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा लिपस्टिक दौरा आहे, असे म्हटले होते, खरेतर त्यापेक्षाही भयंकर असा हा पावडर दौरा होता, अशी खोचक टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांच्या जखमेवर मीठ चोळले!

कालपासून राज्यातील सर्वच मंत्री केंद्राच्या मदतीची टेप वाजवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतत केंद्राकडे मदतीसाठी रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असे थेट केंद्राला सांगावे, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारने कोकणाला पॅकेज द्यावे जेणेकरून कोकणाला आधार मिळेल. केंद्र सरकारला देश चालवायचा आहे. राज्य सरकारने आपली मदत जाहीर करावी आणि ती मिळावी सुद्धा. निसर्ग चक्रीवादळावेळी राज्य सरकारने 25 कोटींची मदत जाहीर केली. पण अजून एक दमडी आली नाही. काल मुख्यमंत्री कोकणातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळून मुंबईला परत गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

(हेही वाचा : बॉम्बेहाय दुर्घटनेला ‘अ‍ॅफकॉन’चे शापूरजी पालनजी कारणीभूत!)

एकनाथ शिंदेंकडून काही तरी शिका!

कोकणातील जनतेने बाळासाहेबांवर खूप प्रेम केले, पण उद्धव ठाकरे यांनी त्या नात्याचा गैरफायदा घेतला. शिवसेना आणि कोकण हे नात उद्धव ठाकरेंना कळले असते, तर कोकणवासीयांचा असा अपमान केला नसता. उलट उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा  एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. शिंदेंनी किमान कोकणवासियांना मदत तरी पाठवली. त्यामुळे बाळासाहेबांचा मूळ शिवसैनिक कसा असतो हे शिंदेंनी दाखवून दिले. त्यांचे मी आभारच मानेन. त्यामुळे शिंदेंकडून काही तरी शिका, असा माझा मुख्यमंत्र्यांना सल्ला राहीन, असा चिमटाही नितेश राणे यांनी काढला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.