Mumbai Road : सिमेंट कॉंक्रिट रस्‍तेबांधणी कामांसाठी महानगरपालिका अभियंते घेणार ‘आयआयटी, मुंबई’चे प्रशिक्षण

पवईतील भारतीय तंत्रज्ञान संस्‍था (आयआयटी, मुंबई) येथे शनिवारी २७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे.

929
CC Road : मुंबईतील नवीन रस्त्यांची कामांना अद्यापही नाही सुरुवात, आचारसंहितेचा बसणार फटका?

मुंबई महानगरपालिकेने सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्‍त्‍यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहेत. रस्‍ते कॉक्रिटीकरणाची कामे अत्‍युच्‍च व सर्वोत्‍तम दर्जाची व्‍हावीत, यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून रस्‍ते बांधणीमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्‍ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये (Do & Dont’s) तसेच प्रत्‍यक्ष ‘फिल्‍ड’वर काम करणाऱ्या अनुभवी अभियंत्‍यांच्‍या शंकांचे निरसन व्‍हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. (Mumbai Road)

पवईतील भारतीय तंत्रज्ञान संस्‍था (आयआयटी, मुंबई) येथे शनिवारी २७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे. महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेस प्रारंभ होणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेचे (आयआयटी) स्‍थापत्‍य अभियांत्रिकी विषयातील नामांकीत तज्‍ज्ञ प्रा. डॉ. के. व्‍ही. कृष्‍ण राव हे महानगरपालिका अभियंत्‍यांना प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत महानगरपालिकेच्‍या १५० अभियंत्‍यांना सिमेंट कॉक्रिट रस्‍ते बांधणीचे तंत्रशुद्ध व शास्‍त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. (Mumbai Road)

(हेही वाचा – Mamata Banerjee : ममता बॅनर्जी हिंदूंना म्हणाल्या ‘काफिर’; भाजपाला पाठिंबा द्यालं, तर अल्ला शपथ…सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)

कार्यशाळेत दिली जाणार ही माहिती 

महानगरपालिकेने मुंबईतील प्रमुख रस्‍ते खड्डेमुक्‍त करण्‍यासाठी रस्‍त्‍यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्‍याचे धोरण आखले आहे. त्‍याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यासाठी अभियंता वर्ग कार्यरत आहेत. कॉंक्रिट रस्‍ते बांधणी कामे अधिक दर्जेदार आणि गुणवत्‍तापूर्ण व्‍हावीत, अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, तांत्रिक ज्ञानाबरोबरच रस्‍ते बांधणीसाठी काय करावे आणि काय करू नये (Do & Dont’s), दैनंदिन कार्यप्रणालीत सुधारणा या विविध पैलुंची माहिती अभियंत्‍यांना व्‍हावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. (Mumbai Road)

मार्गदर्शन, प्रशिक्षणाबरोबरच प्रत्‍यक्ष क्षेत्रावर कार्यरत असणाऱ्या अभियंत्‍यांच्‍या विविध शंका-प्रश्‍न आदींचे देखील निरसन ‘आयआयटी-मुंबई’तील तज्‍ज्ञ प्राध्‍यापक मंडळी या कार्यशाळेत करणार आहेत. शनिवारी २७ एप्रिल २०२४ च्‍या कार्यशाळेत १५० स्‍थापत्‍य अभियंत्‍यांना तर शनिवारी दिनांक ४ मे २०२४ रोजीच्‍या कार्यशाळेत आणखी १५० स्‍थापत्‍य अभियंत्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिमेंट कॉंक्रिट रस्‍त्‍यांचा दर्जा अत्‍युच्‍च, सर्वोत्‍तम व्‍हावा यासाठी या कार्यशाळेची मोठी मदत होणार आहे. (Mumbai Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.