Lok Sabha Election 2024 : सुनील गावस्कर यांचे चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन 

Lok Sabha Election 2024 : ‘तुमच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करा आणि मत द्या,’ असं सुनील गावस्कर समालोचन करताना म्हणाले. 

198
Lok Sabha Election 2024 : सुनील गावस्कर यांचे चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन 
  • ऋजुता लुकतुके

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी २७ एप्रिलला होत आहे. या दिवशी १३ राज्यांमध्ये ८८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. अशावेळी माजी क्रिकेटपटू लिटलमास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यातील हैद्राबादमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान सुनील गावस्कर यांनी समालोचन कक्षातून हे आवाहन लोकांना केलं होतं. तो व्हीडिओ भारतीय निवडणूक आयोगाने एडिट करून आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. (Lok Sabha Election 2024)

‘तुमचा मतदानाचा हक्क बजावा आणि तुमचं मत जरुर द्या. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)  यांनी केलेलं मतदानाचं आवाहन ऐका,’ असं या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. यात सुनील गावस्करांचा आवाज आपल्याला ऐकू येतो. ‘जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीतील मोठा सोहळा सध्या सुरू आहे. ९७ कोटी जनतेनं यात मतदानासाठी नोंदणी केली आहे. १०.५ लाख मतदान केंद्र देशभरात सज्ज आहेत. तुम्हाला निवडीचा अधिकार आहे. त्याचा वापर करा आणि मतदानाचा हक्क बजावा,’ असं सुनील गावस्कर यात सांगत आहेत. (Lok Sabha Election 2024)

Insert tweet – https://twitter.com/ECISVEEP/status/1783526667484578016

(हेही वाचा – West Indies Team in Nepal : विंडिज संघासाठी नेपाळमध्ये हमालाचीही सोय नाही)

१९७१ ते १९८७ दरम्यान सुनील गावस्कर भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी १२५ कसोटी आणि १०९ एकदिवसीय सामने खेळले. यात ३४ कसोटी शतकांचा त्यांचा विक्रम होता. तसंच कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा गाठणारेही ते पहिलेच फलंदाज होते. सर्वाधिक शतकांचा त्यांचा विक्रम सचिन तेंडुलकरने मोडला आणि ४९ शतकांचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)  निवृत्तीनंतर समालोचन करताना दिसतात. आताही आयपीएल दरम्यान ते समालोचकाच्या भूमिकेत आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.