लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मतदारांसमोर केवळ दोन पर्याय आहेत. एक नरेंद्र मोदी आणि दुसरे राहुल गांधी. महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. परंतु १० जागांसाठी कुणी जाहीरनामा प्रसिद्ध करत नाही. या दोघांचा जाहीरनामा हा काँग्रेसचाच जाहीरनामा आहे, असा घणाघाती हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राजापूर येथे नारायण राणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यावरही फडणवीस यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शरद पवार हे ५४२ पैकी फक्त दहा सीट लढवत आहेत. तरीदेखील त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांचा जाहीरनामा चालणार नाही. तर राहुल गांधींचा जाहीरनामा चालणार कारण ते त्यांचे नेते आहेत. उद्धव ठाकरेंनीही जाहीरनामा प्रसिद्ध केला. परंतु त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध व्हायलाही तयार नव्हता. तो जाहीरनामा हातात घेताच खाली पडला आहे. (Lok Sabha Election 2024)
सबका साथ सबका विकास म्हणत आमची गाडी पुढे जात आहे. राहुल गांधींकडे डब्बे नाही, तर तिकडे सगळे इंजिन आहेत, त्यांच्याकडे प्रत्येकाला इंजिन व्हायचे आहे, लालू प्रसाद यांना त्यांच्या मुलाला पुढे न्यायचे आहे, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना पुढे न्यायचे आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुलाला आदित्य ठाकरेला इंजिनमध्ये जागा द्यायची आहे. तसेच, सोनिया गांधींच्या इंजिनात केवळ राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाच जागा असल्याचे फडणवीस म्हणाले.
मोदींनी देशाचा विकास केला
मोदींनी गेल्या दहा वर्षात देश बदलला. वीस कोटी लोकांना पक्के घर मिळाले. जनतेला गॅस, आयुष्मान भारतद्वारे मोफत उपचार, उद्योजकांना बिनव्याजी कर्ज दिले. त्यासोबतच ३१ कोटी महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. यापुढे आता मोदी यांनी २० कोटी रुपये बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community