जोहरा मुमताज सेहगल (Zohra Sehgal) ह्या भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि कोरिओग्राफर होत्या. त्यांनी १९४० च्या दशकापासून अभिनय करायला सुरुवात केली. त्याआधी नर्तिका म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली होती. आठ दशकांहून अधिक काळ त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. या काळात त्यांनी अनेक ब्रिटीश चित्रपट, टेलिव्हिजन शो आणि बॉलीवूड चित्रपटांमधे काम केले.
नीचा नगर, अफसर, भाजी ऑन द बीच, द मिस्टिक मासूर, बेंड इट लाइक बेकहॅम, दिल से, साया अशा अनेक हिट चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी २००२ मध्ये आलेल्या चलो इश्क लडाये चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली होती. त्यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) आणि पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये १४ वर्षे काम केले.
(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : शरद पवार, उद्धव ठाकरेंचा मूळ जाहीरनामा काँग्रेसचाच; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल)
जोहरा बेगम (Zohra Sehgal) मुमताजुल्ला खान यांचा जन्म २७ एप्रिल १९१२ रोजी सहारनपूर, संयुक्त प्रांत, ब्रिटिश भारत येथे झाला. वयाच्या पहिल्या वर्षी त्यांना काचबिंदू झाला तेव्हा त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. त्यांना बर्मिंगहॅम येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांच्या तिथे उपचार करण्यात आले. १९३५ मध्ये त्यांना बाहेरच्या देशात जाऊन नृत्य सादर करण्याची संधी मिळाली.
सेहगल (Zohra Sehgal) यांना १९९८ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. २००१ मध्ये कालिदास सन्मान आणि २००४ मध्ये संगीत नाटक अकादमीतर्फे आजीवन कामगिरीसाठी संगीत नाटक अकादमी फेलोशिप देऊन सन्मानित केले. २०१० मध्ये त्यांना पद्मविभूषण देखील प्राप्त झाला आहे. १० जुलै २०१४ रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे नवी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले.
Join Our WhatsApp Community