लोकसभा निवडणूक २०२४च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या टप्प्यात देशातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ज्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळ आदी राज्यांचा समावेश होता. त्रिपूरातील एका जागेवर सर्वाधिक ६६.९७ टक्के इतके मतदान झाले. तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी ८ जागेवर अनुक्रमे ५३.१७ आणि ५३.७१ टक्के इतके कमी मतदान झाले.
देशभरातील राज्यांत कुठे किती झाले मतदान?
- त्रिपूरा- ७७.९७ टक्के (१ जागा)
- मणिपूर- ७७.१८ टक्के (१ जागा)
- छत्तीसगड-७२.५१ टक्के (३ जागा)
- पश्चिम बंगाल- ७१.८४ टक्के (३ जागा)
- आसाम-७०.६८ टक्के (५ जागा)
- जम्मू काश्मीर- ६७.२२ टक्के (१ जागा)
- केरळ- ६५.०४ टक्के (२० जागा)
- कर्नाटक- ६४.५७ टक्के (१४ जागा)
- राजस्थान- ६०.०६ टक्के (१३ जागा)
- मध्य प्रदेश-५५.३२ टक्के (६ जागा)
- बिहार- ५४.१७ टक्के (५ जागा)
- महाराष्ट्र- ५३.७१ टक्के (८ जागा)
- उत्तर प्रदेश- ५३.१७ टक्के (८ जागा)
महाराष्ट्र मतदारसंघनिहाय टक्केवारी
वर्धा: ५६.६६ टक्के
अकोला: ५२.४९ टक्के
अमरावती: ५४.५० टक्के
बुलढाणा: ५२.२४ टक्के
हिंगोली: ५२.०३ टक्के
नांदेड: ५२.४७ टक्के
परभणी: ५३.७९ टक्के
यवतमाळ – वाशिम: ५४.०४ टक्के
Join Our WhatsApp Community