मणिपूरमधील (Manipur) हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच शुक्रवारी (२६ एप्रिल) मध्यरात्री कुकी कट्टरपंथीयांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत. (Manipur)
Two Central Reserve Police Force (CRPF) personnel lost their lives in an attack by Kuki militants starting from midnight till 2:15 am at Naransena area in Manipur. The personnel are from CRPF’s 128 Battalion deployed at Naransena area in Bishnupur district in the state: Manipur…
— ANI (@ANI) April 27, 2024
(हेही वाचा –Lok Sabha Elections 2024: दुसऱ्या टप्प्यात देशात आणि राज्यात कुठे किती टक्के झाले मतदान?)
याबाबत माहिती देताना मणिपूर (Manipur) पोलिसांनी सांगितले की, “शुक्रवारी रात्री उशिरा ते मध्यरात्री २.१५ च्या दरम्यान कुकी कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला. हे दोन्ही जवान मणिपूरच्या (Manipur) बिष्णुपूर जिल्ह्यातील नरसेना भागात तैनात सीआरपीएफच्या १२८ व्या बटालियनचे होते.” (Manipur)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community