मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी उद्या मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये, सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० पर्यंत आणि चुनाभट्टी-वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. (Mumbai Local Update)
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
(Central Railway)
स्थानक- ठाणे ते कल्याण
मार्ग- अप आणि डाउन धीमा
वेळ- सकाळी ११ ते दुपारी ४
परिणाम- ब्लॉक कालावधीत ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावरील अप-डाउन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल २५ मिनिटे विलंबाने धावतील. (Mumbai Local Update)
हार्बर रेल्वे
(Harbor Railway)
स्थानक- सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे
मार्ग- अप आणि डाउन
वेळ- सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०
परिणाम- ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी आणि सीएसएमटी ते वांद्रे/ गोरेगावसाठी धावणाऱ्या अप-डाउन लोकल बंद राहणार आहेत. फलाट क्रमांक ८ वरून पनवेल ते कुर्ल्यादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. (Mumbai Local Update)
पश्चिम रेल्वे
(Western Railway)
स्थानक- वसई रोड
मार्ग- अप आणि डाउन दिवा
वेळ- शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते रविवारी पहाटे ३.१५
परिणाम- वसई रोड यार्डातील रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. (Mumbai Local Update)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community