Mumbai Water Supply : मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल इतकेच पाणी

भातसा, तानसा जलाशयांची पाणी पातळी खाली गेली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी देखील मुंबईकरांना साधारणतः १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

1142
Mumbai Water Supply : मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल इतकेच पाणी

भातसा, तानसा जलाशयांची पाणी पातळी खाली गेली असली तरीही मुंबईकरांना साधारणतः १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. यंदा पावसाळा वेळेवर सुरु होऊन समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे, असा दाखला देत महापालिका आयुक्‍त व प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईकरांना विश्वास दिला आहे. (Mumbai Water Supply)

मुंबई महानगरात गत २३ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी २७ एप्रिल २०२४) सर्व २५ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. (Mumbai Water Supply)

(हेही वाचा – Mumbai Crime : दोन भावंडांच्या मृत्यूनंतर बेवारस उभी असलेली वाहने मनपा आणि वाहतूक पोलिसांच्या रडारवर)

यानिमित्ताने प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना त्यांनी गगराणी यांनी विश्वास व्यक्त केला. मुंबईकरांना यंदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असे स्‍पष्‍ट करताना आयुक्‍त भूषण गगराणी म्‍हणाले की, जलपुरवठ्याची परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. गतवर्षी पाऊस कमी झाला होता. जो पाऊस झाला, तो कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाला होता. त्यामुळे पाणी साठा कमी झाला. भातसा, तानसा जलाशयांची पाणी पातळी खाली गेली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी देखील मुंबईकरांना साधारणतः १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. यंदा पावसाळा वेळेवर सुरु होऊन समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे, याकडेही आयुक्‍तांनी प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींचे लक्ष वेधले. (Mumbai Water Supply)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.