रविवारी 14 तास बंद राहणार NEFT सेवा!

22 मे रोजी बँकांचे कामकाज संपल्यावर टेक्निकल अपग्रेडेशनसाठी 23 मे रोजी रात्री 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत NEFT बंद राहिल.

106

सध्याचा लॉकडाऊनच्या काळात बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. मात्र रविवारी, २३ मे रोजी तब्बल १४ तास नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टीम (NEFT) ही सेवा बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने ट्विटद्वारे दिली आहे. एनईएफटीद्वारे भारतातील कोणत्याही ठिकाणी बँकेच्या शाखेत न जाता कुठेही पैसे पाठवू शकतो.

काय म्हटले रिझर्व्ह बँकेने? 

आयआरबीने 17 मे रोजी ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. 22 मे रोजी बँकांचे कामकाज संपल्यानंतर टेक्निकल अपग्रेडेशनमुळे NEFT 23 मे रोजी रात्री 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहिल. दुसरीकडे RTGS सेवा मात्र सुरु राहणार आहे.

काय आहे NEFT सेवा!

NEFT संपूर्ण देशात वापरले जाते. या सेवेद्वारे पैसे पाठवण्यासाठी किमान किंवा कमाल मर्यादा नसते. NEFT हे बँकेच्या मोबाईल अ‌ॅपवर वापरता येते. एनईएफटी ही सरळ आणि सोपी, सुरक्षित सुविधा आहे. ही सेवा वापरल्यानंतर ग्राहकांना ई-मेल आणि एसएमएस प्राप्त होतो. इंटरनेट बँकिगद्वारे ही सुविधा कधीही वापरता येते. एनईएफटीद्वारे दोन्ही व्यक्तींना एकाच ठिकाणी उपस्थित राहण्याची गरज नाही. या सुविधेद्वारे करण्यात आलेल्या व्यवहाराची माहिती पैसे पाठवणाऱ्याला आणि पैसे स्वीकारणाऱ्याला देखील मिळते. याद्वारे काही मिनिटांत पैसे पाठवले जातात.

(हेही वाचा : हिंदुद्वेष्ट्या शरजीलविरोधात आणखी एक गुन्हा दाखल! )

NEFT द्वारे कसे ट्रान्सफर करतात पैसे?

लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे तुमचे ऑनलाईन बैंकिंग अकाऊँट ओपन करा. NEFT Fund Transfer सेक्शनमध्ये जावा. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव, बँक अकाऊँट नंबर आणि आयएफएससी कोड टाका. ज्याला पैसे पाठवणार आहोत त्याची माहिती जतन झाली की तुम्ही पैसे पाठवू शकता. तुम्हाला जितकी रक्कम पाठवायची आहे ती टाका आणि पैसे पाठवा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.