उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईत भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा (Mihir kotecha) यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, मागील पाच वर्षांच्या तुलनेत कोटेचांच्या संपत्तीत सोने, चांदीमुळे मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सन २०१९च्या प्रतिज्ञापत्रात कोटेचा यांच्याकडे ३ लाख १८ हजार किंमतीचे सोने तर पत्नीच्या नावे २२ लाखांचे सोने आणि १७ लाखांचे हिरेजडित दागिने असल्याचे नमुद केले होते. तर सन २०२४च्या प्रतिज्ञापत्रकात कोटेच्या या दागिन्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा एकूण आकडा सुमारे ७५ लाखांवर जावून पोहोचला आहे. कोटेच्या दाम्पत्याकडे एकूण ७४ तोळे सोने आणि दीड किलो चांदी आणि हिरेजडित दागिने असल्याचे नमुद केले. (Mihir kotecha)
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा (Mihir kotecha) यांची संपत्ती सन २०१९च्या तुलनेत जवळपास निम्मी झाल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येत आहे. सन २०१९ मुलुंड विधानसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोटेचा यांनी आपल्याकडे १५.१७ कोटी रुपयांची जंगम तर ३. ४९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती. याशिवाय १५.६२ कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या पत्नीकडे ८५ लाख रुपयांची जंगम मालमत्ता होती. तर त्यांच्या नावावर कुठेही जंगम मालमतता अथवा कर्ज नव्हते. (Mihir kotecha)
(हेही वाचा – Hamas Israel conflict: ‘ओलिसांना सोडा…ही शेवटची संधी’; इस्रायलचा हमासचा इशारा)
कोटेंचांकडे इतकी आहे संपत्ती
मात्र, आगामी ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोटेचा (Mihir kotecha) यांनी आपली जंगम मालमत्ता ७.२३ कोटी रुपये व स्थावर मालमत्ता ३.६५ कोटी रुपयांची आहे. तर पत्नीच्या नावे जंगम मालमत्तेत काहीशी वाढ होऊन १.२३ कोटी रुपयांपर्यंत पोहोली आहे. कोटेचा यांच्या पत्नीकडे २.४३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर कोटेचा यांच्यावरील कर्जाची रक्कम ही ७ कोटी रुपये असल्याचे दिसून येत आहे. (Mihir kotecha)
कोटेचा यांनी मुलुंड विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण उत्पन्न हे ४७ लाख ९७ हजार रुपये दर्शवले होते, परंतु लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी एकूण उत्पन्न १ कोटी ५१ लाख रुपये एवढे दर्शवले आहे. त्यामुळे एकूण उत्पन्नत एक कोटींहून अधिक वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. (Mihir kotecha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community