Reliance Retail : रिलायन्स रिटेल्स कंपनी आता देशातील सगळ्यात मोठी रिटेल उद्योग कंपनी

Reliance Retail : रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाचं मूल्यांकन १०० अब्ज अमेरिकन डॉलर. 

179
Reliance Bonus Share : रिलायन्स कंपनी भागधारकांना देणार एकावर एक बोनस शेअर
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स कंपनीने अलीकडेच आपला तिमाही निकाल जाहीर केला आणि यात रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाची वाढ ही सगळ्यात जास्त दिसून आली आहे. रिटेल उद्योगाचं एकूण मूल्यांकन १०० अब्ज अमेरिकन डॉलर इतकं असेल असा अंदाज काही क्रेडिट रेटिंग कंपन्यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीची एकूण विक्री ३ लाख कोटी रुपयांची होती. आणि मूल्यांकनाचा अंदाज बघितला तर कंपनी आयटीसी, एचयुएल, डी मार्ट, नेस्ले, ब्रिटानिया, टाटा कन्झ्युमर आणि गोदरेज कन्झ्युमर या कंपन्यांच्या एकत्रित मूल्यांपेक्षा जास्त भरेल. (Reliance Retail)

रिटेल उद्योगातील आघाडीची भारतीय कंपनी ॲव्हेन्यू सुपरमार्केट पेक्षा रिलायन्सचं मूल्यांकन पाचपट जास्त आहे. यापूर्वीच रिलायन्स रिटेल्सचं मूल्यांकन ११० अब्ज अमेरिकन डॉलर असेल असा अंदाज व्यक्त झालेलं आहे. आताच्या घडीला आयटीसी आणि हिंदुस्थान लिव्हरपेक्षा हे मूल्यांकन जास्त आहे. आयटीसीचं मूल्यांकन आहे ६६ दशलक्ष अमेरिकन डॉलर. तर हिंदुस्थान युनिलिव्हरचं मूल्यांकन ६२ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकं आहे. (Reliance Retail)

(हेही वाचा – IPL 2024 PBKS vs KKR : आयपीएलमध्ये सुनील नरेनची विराट कोहलीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी)

ऑफलाईन आणि ऑनलाईन बाजारपेठेतली रिलायन्सची मक्तेदारी, नफ्याचं वाढलेलं प्रमाण आणि प्रायव्हेट लेबल्समध्ये होणारी वाढ याचा फायदा रिलायन्सला मिळाला आहे. रिलायन्सवरील कर्ज २.३० ट्रिलियन रुपये इतकं आहे. रिलायन्स रिटेल्समध्ये जिओ स्टोअर्स म्हणजे जिओच्या सेवा देणारी छोट्या दुकानांचाही समावेश आहे. आणि त्याचाही फायदा रिलायन्स रिटेल्सला मिळाला आहे. ई-कॉमर्स, ऑनलाईन अशा सगळ्याच क्षेत्रात रिलायन्सचा असलेला संचार कंपनीला उपयोगी पडला आहे. कारण, बाकीच्या कंपन्या या फक्त त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. (Reliance Retail)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.