Narendra Modi: कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवले, काँग्रेसचा देशभरात हेच मॉडेल राबवण्याचा प्लॅन; PM Modi यांचा हल्लाबोल

मोदींनी सांगितले की, देशात काँग्रेसची सत्ता आल्यास देशभरात आरक्षणाच्या कर्नाटक मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल.

260
PM Narendra Modi : पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार; पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

कोल्हापुरात (Kolhapur) शुक्रवारपासून गादी आणि मोदी अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापुरातील सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी ‘मान देऊ गादीला, मत देऊ मोदीला…’ , अशी घोषणा करत कोल्हापुराकरांना साद घातली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदींचं गुणगान करत, महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi)भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे मराठीतून केली. कोल्हापूरच्या आई अंबाबाईला वंदन करून मोदींनी कोल्हापूर हा फुटबॉल प्लेअर्सचा जिल्हा आहे. जगात भारी, कोल्हापुरी असे कौतुकही मोदींनी आपल्या भाषणातून केले. यावेळी मोदींनी इंडिया आघाडीवर टीका करताना काँग्रेसकडून काही विशिष्ट समाजाला धरून व्होट बँकेचं राजकारण केलं जात असल्याचं मोदींनी म्हटलं.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात ३५० बसेस आरक्षित, २ दिवस प्रवाशांचे हाल)

मुसलमानांना ओबीसीतून आरक्षण
मोदींनी आपल्या भाषणात कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा दाखला देत, काँग्रेसने व्होट बँकेसाठी मुसलमानांना ओबीसीतून आरक्षण दिलं. कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, त्यामुळे राज्यातील ओबीसींवर अन्याय झाला. काँग्रेसला देशभर हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकार बनावो आणि नोट कमाओ हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा अजेंडा आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. दरम्यान, यापूर्वीच्या रामटेक येथील भाषणातही मोदींनी जादा बच्चे पैदा करनेवालों का काँग्रेस लाभ दिलाना चाहती है, असे म्हणत काँग्रेसच्या धार्मिक राजकारणावर भाष्य केलं होतं.

काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षणाच्या कर्नाटक मॉडेलची अंमलबजावणी
कोल्हापूर येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक नवा मुद्दा प्रचारात आणला. मोदींनी सांगितले की, देशात काँग्रेसची सत्ता आल्यास देशभरात आरक्षणाच्या कर्नाटक मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने ओबीसी कोट्यातील २७ टक्के आरक्षण रातोरात कागदपत्रांवर शिक्के मारून मुस्लिमांना देऊन टाकले. त्यामुळे एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी कोट्यातील २७ टक्के आरक्षण लागू झाले. त्यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्णपणे लुटले. २०१२ मध्ये काँग्रेस सरकारने हा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला. आता काँग्रेसला संविधान बदलून दलित आणि मागासांचं आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे. काँग्रेस नव्याने हा प्रयत्न करणार असेल, तर तुम्ही हे खपवून घेणार का, असा सवाल मोदींनी उपस्थित केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.