- ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्सचा संघ आपला पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर खेळायला सज्ज झाला आहे. त्यासाठी संघ सरावही करत आहे. पण, त्या दरम्यान घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले सूर्यकुमार यादव आणि टिम डेव्हीड यांनी चक्क मैदानातील कॅमेरे तोडले. मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि याचा मथळाच असा आहे की, ‘या रीलसाठी आम्हाला ४०,००० रुपयांचा भुर्दंड पडला!’ (IPL 2024 Mumbai Indians)
खेळाडूंच्या प्रत्येक फटक्यामुळे कॅमेराचं नुकसान होतंय आणि ते वाढत जाऊन ४०,००० रुपयांपर्यंत गेलंय असा व्हिडिओचा आशय आहे. (IPL 2024 Mumbai Indians)
This reel cost us 40k to make… 😰#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/ISqo0Ax4tW
— Mumbai Indians (@mipaltan) April 26, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Elections : राज्यातील दोन टप्प्यातील मतदान मागच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत कमी..)
‘या’ खेळाडूने षटकामागे १० या गतीने लुटल्या धावा
मुंबई इंडियन्सचा संघ सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयशी ठरतोय. आतापर्यंत संघाने ८ पैकी ३ सामने जिंकले आहेत. शेवटच्या ४ सामन्यांपैकी ३ सामने संघाने जिंकले. पण, तेवढ्यात राजस्थान रॉयल्सकडून संघाचा ९ गडी राखून पराभव झाला. त्यामुळे संघाला पुन्हा उसळी मारण्यासाठी काहीतरी ठोस करून दाखवावं लागणार आहे. सध्या संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर असल्यामुळे पुढील प्रत्येक सामना संघाला जिंकावाच लागणार आहे. (IPL 2024 Mumbai Indians)
संघाची गोलंदाजी हा कच्चा दुवा असून जसप्रीत बुमरा सोडला तर एकही गोलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत नाही. बुमराने ८ सामन्यांत १३ बळी मिळवले आहेत. पण, दक्षिण आफ्रिकेचा गेराल्ड कोत्झीए अजून पुरेसा फॉर्मात नाही. तर पियुल चावलाची फिरकीही संघाला बळी मिळवून देऊ शकत नाहीए. कोत्झीएनं षटकामागे १० या गतीने धावा लुटल्या आहेत. (IPL 2024 Mumbai Indians)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community